जयभवानी कारखान्याची क्षमता वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:13+5:302021-08-18T04:39:13+5:30

गेवराई : तालुक्यातील गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू केली असून, जुनी यंत्रसामग्री बदलून ...

Jayabhavani will increase the capacity of the factory | जयभवानी कारखान्याची क्षमता वाढविणार

जयभवानी कारखान्याची क्षमता वाढविणार

गेवराई : तालुक्यातील गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू केली असून, जुनी यंत्रसामग्री बदलून त्याठिकाणी नवीन व अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवून कारखान्याची कार्यक्षमता वाढविली जात आहे. २०२१-२२ या गळीत हंगामामध्ये प्रतिदिन साडेचार ते पाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. यावर्षीच्या गळीत हंगामाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने रोलर पूजनाचा पहिला टप्पा संपन्न झाला. याप्रसंगी श्री क्षेत्र रामगड संस्था घोसापुरीचे मठाधिपती ह.भ.प. योगिराज महाराज, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कृ.ऊ.बा.समितीचे सभापती जगन पाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नाटकर, अप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, साहेबराव पांढरे, शिवाजी कापसे, भारत पंडित, संभाजी पवळ, मोहम्मद गौस, जगन्नाथ दिवाण, ग. प. खरात आदी उपस्थित होते. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, संचालक राजेंद्र खाडप यांच्यासह कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

160821\4406img-20210816-wa0160_14.jpg

Web Title: Jayabhavani will increase the capacity of the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.