जवान परमेश्वर घुमरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:42+5:302021-02-05T08:22:42+5:30
परमेश्वर घुमरे यांची १९९३ मध्ये नांदेड येथील भरती प्रक्रियेतून केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली होती. नियमित प्रक्रियेनुसार ते ...

जवान परमेश्वर घुमरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
परमेश्वर घुमरे यांची १९९३ मध्ये नांदेड येथील भरती प्रक्रियेतून केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली होती. नियमित प्रक्रियेनुसार ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर विनंतीनुसार त्यांना पुन्हा सेवेचे संधी मिळाली. सध्या ते मुंबई येथे कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी (दि. ३०) त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी जन्मगाव पारगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पाटोदा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे, केंद्रीय राखीव पोलीस फोर्सचे निरीक्षक माने तसेच आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे तसेच गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.