जावयाला ठोकले ; चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:41+5:302021-01-09T04:28:41+5:30

तालुक्यातील ढाकेफळ येथील बबन भागवत काळे (वय २८) यांची सोनीजवळा ही सासुरवाडी आहे. काही दिवसांपूर्वी पत्नी रेखा ही माहेरी ...

Javaya knocked; Crime against four | जावयाला ठोकले ; चौघांविरुद्ध गुन्हा

जावयाला ठोकले ; चौघांविरुद्ध गुन्हा

तालुक्यातील ढाकेफळ येथील बबन भागवत काळे (वय २८) यांची सोनीजवळा ही सासुरवाडी आहे. काही दिवसांपूर्वी पत्नी रेखा ही माहेरी आली होती. त्यामुळे पत्नीला आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी बबन काळे हा आईवडिलांसह ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता सोनीजवळा येथे गेला. यावेळी पोलीस पाटील असलेले सासरे राजाराम बन्सी पवार, मेहुणे जयसिंग राजाराम पवार, राहुल राजाराम पवार, चुलतसासरे दादा बन्सी काळे या चौघांनी भांडणाची कुरापत काढून जावई बबन काळे यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन काळे जखमी झाले. यावेळी त्यांचे आईवडील भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बबन काळे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पो. ना. परमेश्वर शिंदे हे तपास करीत आहेत.

Web Title: Javaya knocked; Crime against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.