तिप्पटवाडी सरपंचपदी जनाबाई शेंडगे तर उपसरपंचपदी विष्णू जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:49+5:302021-02-25T04:41:49+5:30
तिप्पटवाडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत रामचंद्र महाराज ग्रामविकास पॅनलने ५ जागा जिंकल्या होत्या. सरपंचपदी ७ पैकी ५ मते मिळवित जनाबाई ...

तिप्पटवाडी सरपंचपदी जनाबाई शेंडगे तर उपसरपंचपदी विष्णू जाधव
तिप्पटवाडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीत रामचंद्र महाराज ग्रामविकास पॅनलने ५ जागा जिंकल्या होत्या. सरपंचपदी ७ पैकी ५ मते मिळवित जनाबाई शेंडगे तर उपसरपंचपदी विष्णू जाधव यांची निवड झाली. मंडळ अधिकारी ए.ए.झेंड यांनी कामकाज पाहिले. त्यांना तलाठी विजय बहीर आणि ग्रामसेवक एस.बी.आढाव यांनी सहकार्य केले.
नगर रोड ते पालवण रस्त्याची दुरवस्था
बीड : शहरातील धानोरा रोडकडे जाणाऱ्या नगररोड ते पालवन चौक भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी नागरीकांनी वेळोवेळी निवेदने देत उपोषण केले. मात्र काही ठिकाणचे खड्डे थातुरमातूर पध्दतीने बुजविले. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने चालकांना वाहने आदळत न्यावी लागत आहेत. तर मातीच्या धुराळ्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. परिरामी येथील व्यवसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.