जामखेड आगाराने घेतली प्रवाशांसी फारकत; साठ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली बस बंद- A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:01+5:302021-03-05T04:33:01+5:30
आगार प्रमुखाने या प्रवाशांच्या भावनेचा आदर करून पूर्ववत गाडी सुरू करून प्रवासी व बस या नात्याला उजाळा द्यावा, अशीच ...

जामखेड आगाराने घेतली प्रवाशांसी फारकत; साठ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली बस बंद- A
आगार प्रमुखाने या प्रवाशांच्या भावनेचा आदर करून पूर्ववत गाडी सुरू करून प्रवासी व बस या नात्याला उजाळा द्यावा, अशीच भावना व्यक्त होत आहे.
सर्वात आधी शिरूर मुक्कामी दोन बस गाड्या येत असत तर यात एक जामखेड-शिरूर तर दुसरी पारनेर डेपोची पारनेर-शिरूर. कधी कधी शिरूरला चिखलपाण्यामुळे पोहोचता नाही आले तर ही गाडी सिंदफणा मुक्काम करून प्रवासी घेऊन जात होती. या गाड्यांनी प्रदीर्घ काळ शिरूर मुक्कामी येऊन प्रवाशांची सेवा केली. पुढे पारनेर डेपोची गाडी बंद झाली; मात्र जामखेड डेपोने ही गाडी सातत्याने चालु ठेवली. या गाडीमुळे शिरूर, कोळवाडी, रूप्पुर, गोमळवाडा, सिंदफना, नांदूर, पिंपळवाडी,
अंमळनेर, कुसळंब, सौताडा, करत जामखेडपर्यंत जाता येत असे. पुढे हीच गाडी करमाळ्यापर्यंत जात असल्याने जामखेडच्या पुढचा प्रवास नान्नज ,जवळा ,करमाळा व जवळच्या गावांना जाता येत होते. एवढेच नव्हे तर या गाडीमुळे करमाळा ते श्रीक्षेत्र पंढरपूरला वारकरी जात होता. त्यामुळे ही गाडी सर्वांच्या सोयीसाठी असल्याची भावना होती. शिरूरला बीड, नगर औरंगाबाद, पैठन, नगर अशा गाड्या सुरू झाल्या; मात्र एकमेव जामखेड आगाराची शिरूर मुक्कामी गाडी सुरू झाली नसल्याने या मार्गावरचा प्रवास
प्रवाशांसाठी खडतर बनला असून, नाइलाजास्तव वेगळ्या वळणाने जामखेडला जावे लागते. त्यातून वेळ व पैसा अधिकचा खर्ची घालावा लागत आहे .