मांजराचे पाणी नदीपात्रातून सोडल्यास जलसमाधी आंदोलन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:29 IST2021-03-22T04:29:48+5:302021-03-22T04:29:48+5:30
दीपक नाईकवाडे केज : मांजरा धरणातील पाणी बॅरीगेस भरण्यासाठी कॅनॉलने सोडावे, मात्र बॅरीगेज भरण्यासाठी धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यास जलसमाधी ...

मांजराचे पाणी नदीपात्रातून सोडल्यास जलसमाधी आंदोलन - A
दीपक नाईकवाडे
केज
: मांजरा धरणातील पाणी बॅरीगेस भरण्यासाठी कॅनॉलने सोडावे, मात्र बॅरीगेज भरण्यासाठी धरणातील पाणी नदीपात्रात सोडल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी एकमुखाने घेतला असल्याची माहिती संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे यांनी लोकमतला दिली.
मांजरा धरणातील पाणी नदीपात्रातून सोडू नये या मागणीचे निवेदन देण्यासाठी परिसरातील शेतकरी मांजरा धरणावरील कार्यालयात गेले असता तेथे निवेदन स्वीकारण्यास कोणताही कर्मचारी हजर नसल्याने शेतकऱ्यांनी बैठक घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मांजरा धरणातील १६ दलघमी पाणी बॅरेजेस भरण्यासाठी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय १७ मार्च २०२१ रोजी पार पडलेल्या मांजरा धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय मांजरा धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यावर अन्याय करणारा असल्याने धरणातील पाणी नदीपात्रात सोडू नये, अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे १८ मार्च रोजी दिले होते. तसेच या बाबतचे निवेदन मांजरा धरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी शेतकरी शनिवारी मांजरा धरणाच्या कार्यालयावर गेले असता त्याठिकाणी मांजरा धरणाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी हजर नसल्याने शेतकरी संतप्त झाले.
शेतकऱ्यांनी मांजरा बैठक घेत धरणातील पाण्याचा सर्वाधिक अधिकार हा मांजरा धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा आहे. पाणी नदीपात्रात सोडून पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा बॅरेजेस भरण्यासाठी कॅनॉलमधून धरणातील पाणी सोडावे सोडावे, अशी मागणी यावेळी एकमुखाने शेतकऱ्यांनी केली. तसेच मांजरा धरणात हक्काचे पाच टीएमसी पाणी आणा व नंतर पाण्यासाठी बैठक घ्या, असा सल्लाही शेतकऱ्यांनी दिला.
===Photopath===
200321\1223deepak naikwade_img-20210320-wa0041_14.jpg