जैन जीमखाना, कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:10+5:302021-02-05T08:25:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कडा येथील जैन जीमखानाने कोल्हापूरच्या प्रिन्स ...

जैन जीमखाना, कडाने राज्यस्तरीय बास्केटबॉल चषक जिंकला
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कडा येथील जैन जीमखानाने कोल्हापूरच्या प्रिन्स अकॅडमीचा पराभव करून राज्यस्तरीय चषक आणि रोख २५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. वाय. एन. चव्हाण कॉलेजतर्फे निमंत्रित संघासाठी राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील २४ संघ सहभागी झाले होते. प्रिन्स अकॅडमी, कोल्हापूर आणि जैन जीमखाना, कडा (बीड) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात कडा संघाने प्रिन्स संघावर ७६-५१ने मात करत २५ गुणांनी सामना जिंकला. त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात कडा संघाने औरंगाबाद संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कडा संघाला प्रशिक्षक प्रा. जमीर सय्यद आणि सचिन आळकुटे यांनी मार्गदर्शन केले. विजेत्या संघातील खेळाडूंमध्ये सचिन इटकर (कर्णधार), सकलेन सय्यद, मिथुन दास, अजय पवार, अक्षय खरात, आफताब सय्यद, साहिल धनवडे, गणेश कुसळकर, सागर धनवटे, स्वप्नील ढोबळे आदींचा समावेश आहे.