शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्यामुळेच जिल्ह्याची बदनामी, महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 13:56 IST

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांचा पलटवार

बीड : माझ्या कार्यकाळात जिल्ह्याला मान खाली घालावी लागेल, असं काम केलं नाही. चांगले अधिकारी आणले. माझ्यावर ऑपरेशन झालं, तेव्हा आरोप करण्यात आले. मी बीड जिल्ह्याची काळजी करते. तुमच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली, असा आरोपही पंकजा मुंडे ( Pankaja Munde)यांनी नाव न घेता धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यावर केला. तसेच महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला. गुंडागर्दीचे राजकारण केले असते, तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? असा भावनिक प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. 

लिंबागणेश जिल्हा परिषद सर्कलमधील ३२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन बेलेश्वर संस्थान बेलगाव येथे पंकजा मुंडे यांच्याहस्ते शनिवारी केले, यावेळी त्या बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, जयश्री मस्के, बेलेश्वर संस्थानचे महंत महादेव महाराज भारती, माजी आ. आर. टी. देशमुख, राम कुलकर्णी, सर्जेराव तांदळे, अक्षय मुंदडा, भगीरथ बियाणी, स्वप्नील गलधर, उषाताई मुंडे आदी उपस्थित होते.

कोनशिलेवर नसले तरी जनतेच्या हृदयात माझे नावमाझ्या कारकीर्दीत जिल्ह्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. चांगले अधिकारी आणले, महिलांची सुरक्षा, सन्मान वाढवला. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, विम्यासह कोटयवधी रुपयांचा निधी आणला. हे सर्व मी श्रेय घेण्यासाठी कधीच केलं नाही. माझं नाव कोनशिलेवर नाही आलं तरी चालेल, पण ते जनतेच्या हृदयात कायम कोरलं जावं. भविष्यातही जिल्ह्याचं नाव चांगल्या गोष्टींसाठी घेतलं जावं, त्यासाठीच मी सदैव काम करत आहे, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. थेट नाव घेतले नसले तरी, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राकाँचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनाचा हा टोला समजला जात आहे.

तरुण नेता निर्माण करणारी फॅक्टरीशेकडो कोटींचा विकास केला. केलेल्या कामांचं क्रेडिट घेत नाही. बीडमध्ये उत्तम रोजगार निर्मिती व्हावी, अशी इच्छा होती. बीडमध्ये रेल्वे आणली. महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला. मी तुमची कर्जदार आहे. गुंडागर्दीचे राजकारण केले असते, तर मुंडे साहेबांना शोभलं असतं का? एक तरुण नेता निर्माण करणारी फॅक्टरी मुंडेसाहेबांनी तयार केली. माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता मंत्री, आमदार, खासदार बनला पाहिजे, असेही मुंडे म्हणाल्या.

त्यांच्या शुभेच्छांची गरज नाही - मस्केयावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले, ज्यांना कधी साधा चिरा रोवता आला नाही, ते फुकटचे श्रेय घेतात. चार जि. प सदस्यांना सोडून राष्ट्रवादीला शुभेच्छा देणाऱ्यांच्या शुभेच्छांची आम्हाला गरज नाही, असे म्हणत शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांना टोला लगावला. तसेच पंकजाताई आणि जनतेचे आशीर्वाद काफी आहेत, असे सांगत, बीडचे विद्यमान आमदार हे ताईंनी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्याशिवाय काहीच करत नाहीत, असा आरोप आ. संदीप क्षीरसागरांवर केला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडCrime Newsगुन्हेगारी