पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे हाच राष्ट्रधर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:25+5:302021-03-23T04:35:25+5:30

आंबेजोगाई : येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयातील जलदुत मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी ३० वर्षांपासून जलसाक्षरतेचे धडे विद्यार्थ्यांना ...

It is the national religion to stop every drop of rain | पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे हाच राष्ट्रधर्म

पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे हाच राष्ट्रधर्म

आंबेजोगाई : येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयातील जलदुत मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी ३० वर्षांपासून जलसाक्षरतेचे धडे विद्यार्थ्यांना दिले आहेत. या विभागाच्या माध्यमातून ‘माय अर्थ माय ड्युटी’ अभियानातून जलसाक्षरतेचा जलसंस्कार दिला.

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरवणे, मुरवणे व त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. मानवाला निसर्गाने पाणी व वाणी ही फुकट दिली आहे, त्याचा परिणाम असा की मानवाने त्याचा अतिरेकी वापर केल्यामुळे आज जागतिक पातळीवर पाणी ही मोठी समस्या बनली आहे. त्यासाठी तिसरे महायुद्ध होते की काय अशी परिस्थिती आहे.

तेव्हा तळ्यावर पाणी बचतीचा संदेश देण्याचे काम मेजर कुलकर्णी हे सातत्याने शाळा-महाविद्यालयात जाऊन करत असतात.

पाणी हे राष्ट्राची भरभराट करते. आज पाणीटंचाई ही मानवनिर्मित आपत्ती आहे.

ज्या आपत्तीपासून सुटण्यासाठी जलबचत ही लोक चळवळ करण्यासाठी मेजर हे तीन दशकांपासून काम करतात. प्रामुख्याने चर्चासत्र, गटचर्चा, व्याख्याने, परिषदा यांच्या माध्यमातून ते काम करीत आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्थेने ३५ एकरांत पावसाचा प्रत्येक थेंब अडवला त्या पाण्याचा बऱ्याच लोकांना व प्राण्यांना फायदा झाला व त्या पाण्यावर तीन हजार वृक्ष जोपासली. पाण्याचा संस्कार मुलांवर व्हावा, वॉटर बँक, सोक पिट, लघु तलाव, मध्यम तलाव असे प्रयोग केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसाक्षरतेचे धडे देण्याचे काम मेजर कुलकर्णी करत आहेत.

७५ बंधारे बांधण्याचा संकल्प

मेजर एस. पी. कुलकर्णी यांनी आजपर्यंत मुलांकडून श्रमदानाने तीन लघु तलाव, २५ वॉटर बँक, ५१ वनराई बंधारे ५१ अवघड बंधारे नालाबंडिंगच्या माध्यमातून मोहा, कुंबेफळ, पोखरी या गावी जाऊन श्रमदान केले व पाणी मुरवले. त्याचबरोबर जल है तो कल है या घोषणेप्रमाणे काम केले. या वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षानिमित्ताने ७५ वनराई, अवघड बंधारे व वॉटर बँकेच्या साह्याने पाणी मुरवण्याचा संकल्प केला आहे.

===Photopath===

220321\avinash mudegaonkar_img-20210322-wa0027_14.jpg

===Caption===

अंबाजोगाईत एनसीसीच्या माध्यमातून जलसक्षरतेचे उपक्रम रबविले जात आहेत.

Web Title: It is the national religion to stop every drop of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.