शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांचे बोगस फिटनेस देणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील केंद्रासह ५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:47 IST

प्रत्यक्षात वाहन हजर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे फिटनेस प्रमाणपत्र

बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अत्यंत नियोजनबद्धरीतीने तपास करून परराज्यातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे चालणाऱ्या बोगस फिटनेस प्रमाणपत्रांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात वाहन हजर नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे फिटनेस प्रमाणपत्र देणारे मध्य प्रदेशातील इंदूर येथील एटीएस (ॲटोमॅटिक टेस्ट सेंटर) केंद्र आणि तीन खाजगी मध्यस्थांसह एनआयसीमधील एका अज्ञात व्यक्तीवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकीब रजा (रायपूर, छत्तीसगड), हाजी फारूक अब्दुल सत्तार मन्सुरी (वडोदरा, गुजरात), कपिल मौर्या (ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), मे. अप्पू नोव्हेल सर्व्हिस इंदूरचे संचालक व कर्मचारी व एनआयसीमधील एक अज्ञात व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक गणेश जयराम विघ्ने यांना कामकाजादरम्यान माहिती मिळाली होती की, परराज्यातील एटीएस केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात वाहनांची प्रत्यक्षात तपासणी न करताच बोगस फिटनेस प्रमाणपत्रे जारी केली जात आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी एक विशेष तपास पथक नियुक्त केले. या पथकाने या रॅकेटचा छडा लावण्यासाठी तीन ‘डमी’ वाहनांचा वापर केला.

तपास पथकाने डमी वाहनासाठी (क्रमांक एमएच-१२-व्हीटी-८२९९) रायपूर येथील साकीब रजा नावाच्या मध्यस्थाशी संपर्क साधला. त्याने कोणत्याही तपासणीशिवाय ११,००० रुपयांत फिटनेस करून देण्याचे आश्वासन दिले. धक्कादायक बाब म्हणजे, हे वाहन बीडमधील एका गॅरेजमध्ये आणि टोल नाक्यावर होते, त्याच वेळी मध्य प्रदेशातील ‘अप्पू नोव्हेल सर्व्हिस’ या केंद्राने हे वाहन त्यांच्या लेनमध्ये हजर असल्याचे भासवून फिटनेस प्रमाणपत्र जारी केले. आरटीओने पुराव्यासाठी या वाहनाचे टोल ट्रांझॅक्शन आयडी आणि व्हीएलटीडी लोकेशनचा डेटा गोळा केला, त्यामुळे हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाले. तसेच एमएच-४७-वाय-६७२४ या डमी वाहनासाठी वडोदरा येथील हाजी फारूक मन्सुरी याने १३,००० रुपये घेऊन पुन्हा त्याच इंदूरच्या एटीएस केंद्राकडून बोगस प्रमाणपत्र मिळवून दिले. हे वाहन बीडमधील एका शोरूममध्ये दुरुस्तीसाठी उभे असताना कागदोपत्री मात्र ते इंदूरमध्ये तपासणीसाठी हजर दाखवण्यात आले होते.

एनआयसी डेटाशी छेडखानीसर्वात गंभीर प्रकार डमी वाहन क्रमांक एमएच-०४-ईएल-५८२५ या तिसऱ्या वाहनाच्या बाबतीत समोर आला. ग्वाल्हेर येथील कपिल मौर्या या मध्यस्थाने ५५ हजार रुपये घेऊन, या वाहनाचा तब्बल ७५,५०० रुपयांचा सरकारी दंड बुडवला. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातून बदली झालेल्या एका अधिकाऱ्याच्या नावाचा आणि जुन्या लॉगिन आयडीचा वापर करून हे प्रमाणपत्र पूर्वलक्षी प्रभावाने जारी करण्यात आले. यामध्ये एनआयसीच्या वाहन ४.० प्रणालीतील गोपनीय डेटाची चोरी किंवा छेडखानी झाल्याचे समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Interstate gang busted for fake vehicle fitness certificates; 5 booked.

Web Summary : A bogus vehicle fitness certificate racket was exposed in Beed. Authorities booked five individuals, including those from an Indore-based test center, for issuing certificates without vehicle inspection, using fake documents and NIC data manipulation through intermediaries.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याRto officeआरटीओ ऑफीस