कालिकादेवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:41+5:302021-04-05T04:29:41+5:30
परीक्षेचा निकाल आनंद कराड यांनी जाहीर केला. या स्पर्धेमध्ये एकूण ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात एस. आर. टी. ...

कालिकादेवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा
परीक्षेचा निकाल आनंद कराड यांनी जाहीर केला. या स्पर्धेमध्ये एकूण ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात एस. आर. टी. विद्यापीठ, नांदेड येथील आशिष शिवराज साडेगावकर यांनी ३००१ रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले, तर २००१ रुपयांचे व्दितीय पारितोषक फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथील मैथिली फुले या विद्यार्थिनीने पटकाविले. १००१ रुपयांचे तृतीय पारितोषिक छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथील दत्तात्रेय नाथाभाऊ चोरमले या विद्यार्थ्याने मिळविले. विशेष सन्मान ५००१ रुपयांचे पारितोषिक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील ओमकार जितेंद्र पाटील या विद्यार्थ्याला देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर येवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ पवळे यांनी केले. डॉ. विठ्ठल जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
===Photopath===
040421\04bed_5_04042021_14.jpg