शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परळी रेल्वे पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग; स्वत:चे वाहनही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:22 IST

१८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर कसे ठेवणार नियंत्रण?

ठळक मुद्देपोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत

परळी (जि.बीड) : बीड जिल्ह्यातील मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या परळी रेल्वे स्टेशनमधील रेल्वे पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या अपुरी झाली आहे. या ठाण्यासाठी स्वतंत्र असे वाहनही नाही. त्यामुळे तपासाला रेल्वेनेच जाण्याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पर्याय नाही. आहे त्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण येत असून, धावत्या रेल्वेत घडणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास व तपास कामात तत्परता आणण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

परळी रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील धावत्या रेल्वेमधील घटनेकडे लक्ष दिले जाते. यासाठी केवळ २५ कर्मचारी नेमलेले आहेत. या पोलीस स्टेशनसाठी ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे. परंतु मंजुर क्षमतेएवढे रेल्वे पोलीस कर्मचारीच उपलब्ध नाही. २३ पोलीस कर्मचारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहे. सध्या येथे १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, ११ जमादार, १२ पोलीस कर्मचारी मंजूर आहेत. महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ महिला कर्मचारी आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची ७ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. अपुऱ्या स्टाफवरच १८ रेल्वे स्टेशनमधील घडणाऱ्या घटनेचा तपास करावा लागत आहे.

परळी रेल्वे पोलीस ठाण्याची बीड, परभणी, लातूर या तीन जिल्ह्यात हद्द आहे. यातील परळी रेल्वे स्टेशन, उखळी, वडगाव, गंगाखेड, पोखर्णी, धोंडी, घाटनांदूर, मूर्ती, कारेपूर, पानगाव, जानवळ, लातूर रोड, चाकूर, हेरकुमठा, उदगीर यासह १८ रेल्वे स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीवर  आळा घालण्यासाठी परळी रेल्वे स्टेशनमधून नियोजन केले जाते. हे नियोजन करता करता आहे त्या पोलिसांची तारांबळ होत आहे. रेल्वेचे पोलीस अधिकारी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत, मात्र कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे खाजगीत सांगतात. 

पोलीस बळ वाढल्यास मदत होणारपरळी हे काही रेल्वे गाड्यांचे शेवटचे स्थानक आहे. त्यामुळे लांब अंतरावरुन निघालेल्या या रेल्वेमधून प्रवास करत अनेक मनोरुग्ण, गुन्हेगारी वत्तीचे लोक परळी परिसरात आढळतात. उपविभागीय कार्यालय होऊन पोलीस बळ वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे सुलभ ठरू शकेल.

नेमणुका आणि सीसीटीव्हीच्या मागणीकडे दुर्लक्ष बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रेल्वेने अनेक राज्यातून भाविक येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये दररोज १८ रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे परळी रेल्वे पोलीस स्टेशनमधील रिक्त पदे भरावीत व रेल्वे पोलीस उपअधीक्षक यांचे कार्यालय सुरु करुन नेमणूक करावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. परळी रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही यापूर्वी केलेली आहे. - जी. एस. सौंदळे, अध्यक्ष, परळी रेल्वे प्रवासी संघटना

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वेBeedबीडCrime Newsगुन्हेगारी