अपुरे कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:37 IST2021-01-16T04:37:30+5:302021-01-16T04:37:30+5:30
गटारी तुंबल्या नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र, गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना ...

अपुरे कर्मचारी
गटारी तुंबल्या
नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र, गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्वच्छतेची मागणी होत आहे.
रबी हंगामातील पिके बहरू लागली
बीड : जिल्ह्यात यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पिकांना पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीने खरिपाची पिके तर शेतकऱ्यांची हातून गेली. मात्र, त्यानंतर गहू, ज्वारी, हरभरा, आदी पिके पाण्याची उपलब्धता असल्याने जोमात येऊ लागली आहेत. त्यामुळे या पिकांतून तरी उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा पीक आता जवळपास काढणीस आले आहे. तसेच ज्वारी हुरड्यात आली असून, अनेक ठिकाणी हुरडा पार्ट्या रंगू लागल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.
शिरूर-केज रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूर ते केज रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत गाव, वाड्या, वस्त्या आहेत. नागरिकांची बाजारपेठ केज असल्यामुळे वावर जास्त असते.
महावितरणला समस्यांचे ग्रहण
अंबाजोगाई : ग्रामीण भागात सध्या विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेची मागणी ज्याप्रमाणे वाढत चालली आहे त्याप्रमाणे विजेचा पुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक विद्युत पंप अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी बंद पडू लागले आहेत. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त स्थितीत असल्याने ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे पार्ट, ऑईलची कमतरता आहे. सुविधा देण्याची मागणी होत आहे.
घाणीमुळे भिंती रंगल्या
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये नागरिक व अधिकारी - कर्मचारी धूम्रपान करून थुंकतात. त्यामुळे सर्वत्र घाण झाली आहे. थुंकल्यामुळे भिंती रंगलेल्या दिसत आहेत. शिस्त लावत हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.