गतिरोधक बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:31+5:302021-02-05T08:26:31+5:30

विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती अंबाजोगाई : शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमाचे ...

Install brakes | गतिरोधक बसवा

गतिरोधक बसवा

विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती

अंबाजोगाई : शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा अंबाजोगाई तालुक्यात सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन होत असले तरी शाळेमध्ये विद्यार्थी जाण्यास अजूनही धजावत नाहीत. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत साशंक आहेत. शाळेत शिक्षक आहेत, मात्र विद्यार्थ्यांची अत्यल्प संख्या आहे.

काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास

राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली.

लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर

केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Install brakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.