निष्काम कोरोना सेवाधारींचा प्रेरणा सन्मानपत्राने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:45+5:302021-07-04T04:22:45+5:30

शांतीवनचे दीपक नागरगोजे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी सिद्धेश्वर मंगल कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तालुक्यात कोरोनाची झळ ...

Inspired by Nishkam Corona Sevadhari honored with certificate | निष्काम कोरोना सेवाधारींचा प्रेरणा सन्मानपत्राने गौरव

निष्काम कोरोना सेवाधारींचा प्रेरणा सन्मानपत्राने गौरव

शांतीवनचे दीपक नागरगोजे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी सिद्धेश्वर मंगल कार्यालय सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तालुक्यात कोरोनाची झळ बसलेल्या लोकांना आधार देण्यासाठी किट वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे, जयदत्त धस, अजय धोंडे, सर्जेराव तांदळे उपस्थित होते.

यावेळी ॲड. रामकृष्ण मिसाळ, अशोक सव्वासे, डॉ. रमणलाल बडजाते, नवनाथ ढाकणे, कालिदास आघाव, रामराव खेडकर, रामदास बडे, बबनराव जायभाये, एम.एन. बडे, प्रल्हाद विघ्ने, विठ्ठल वणवे, रामनाथ कांबळे, सुरेश उगलमुगले, भरत खरमाटे, डॉ. मधुसूदन खेडकर, खंडू जाधव, माऊली शिरसाट, बाळासाहेब ढाकणे, शीलाताई आघाव, इंदूबाई गोल्हार, प्रा. सचिन जायभाये, ॲड. प्रकाश बडे, ॲड. भाग्यश्री ढाकणे, आशिष जायभाये, फय्याजभाई शेख, देवा गर्कळ, संदीप ढाकणे, नीलेश ललवाणी, दिनेश तांदळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रेरणापत्र देऊन गौरविण्यात आले.

030721\img-20210702-wa0043.jpg

कोरोना सेंटरवर निष्काम भावनेतून सेवा देणा-या सेवाधारींचा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रेरणा पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Inspired by Nishkam Corona Sevadhari honored with certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.