इनरव्हील क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:41+5:302021-07-27T04:34:41+5:30
अंबाजोगाई : शहरातील इनरव्हील क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासली, असे प्रतिपादन आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केले. क्लबच्या पदग्रहण ...

इनरव्हील क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासली
अंबाजोगाई : शहरातील इनरव्हील क्लबने सामाजिक बांधिलकी जोपासली, असे प्रतिपादन आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केले. क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होते. २०२१-२२ साठी अंजली प्रमोद चरखा यांनी अध्यक्षपदाची तर मेघना संतोष मोहिते यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.
या कार्यक्रमात उपाध्यक्ष धनश्री भानप, कोषाध्यक्ष अर्चना मुंदडा, आयएसवो सोनाली कर्नावट, इडिटर संगीता नावंदर सह-सचिव रेखा शितोळे, आयपीपी सुहासिनी मोदी, सीसीसी रंजना कराड यांनीही नवीन वर्षासाठी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी आ. नमिता मुंदडा यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देताना इनरव्हीलच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. मागील वर्षीचा क्लबचा अहवाल सचिव मेघना मोहिते यांनी सादर केला. येणाऱ्या वर्षात प्रस्तावित कार्याची माहिती अंजली चरखा यांनी उपस्थितांना दिली. निधी अभावी बरेच उपक्रम राबवता येत नसल्याची खंत व्यक्त करून समाजातील दानशूर व्यक्तींनी पैसे, वस्तू व धान्य स्वरुपात क्लबच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. करण्याची विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाचे संचलन उमा दीक्षित यांनी केले. स्वागत गीत सुनीता कात्रेला व जयश्री लोढा यांनी गायले. प्रमुख पाहुण्याचा परिचय रंजना कराड यांनी करून दिला. वैजयंती टाकळकर यांनी आभार मानले. या वेळी नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
250721\0231img-20210725-wa0048.jpg
रोटरी इनरव्हील क्लब च्या पदग्रहन समारंभाचे दिपप्रजवलन करताना आ नमिता मुंदडा व महिला पदाधिकारी