धारूर नगर परिषदेला माहिती आयोगाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:57+5:302021-02-05T08:22:57+5:30
धारूर : शहरातील शिवाजी जाधव आणि शहेबाज अन्वर पठान यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. पण त्यांना माहिती ...

धारूर नगर परिषदेला माहिती आयोगाचा दणका
धारूर : शहरातील शिवाजी जाधव आणि शहेबाज अन्वर पठान यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. पण त्यांना माहिती न दिल्यामुळे धारूर नगर परिषदेच्या जन माहिती अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड राज्य माहिती आयोगाने सुनावला आहे.
जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली. तरीही त्यांनी त्यांचा खुलासा सादर केलेला नाही. संबंधित जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी या प्रकरणी निर्णय व निर्देशांक जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून माहिती अधिकार २००५ या कायद्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याचा ठपका ठेवण्यात आला. राज्य माहिती आयोगाच्या प्राप्त झालेल्या अधिकाराने दोन्ही प्रकरणात धारूर नगर परिषदेच्या जन माहिती अधिकाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. तसेच भविष्यात अशी पुनरावृत्ती न करण्याची ताकीद आयोगातर्फे संबंधित प्रथम अपिलीय अधिकारी यांना देण्यात आली.