डासांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:45 IST2021-02-27T04:45:13+5:302021-02-27T04:45:13+5:30

श्वानांचा बंदोबस्त करा बीड : शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने ...

The infestation of mosquitoes increased | डासांचा उपद्रव वाढला

डासांचा उपद्रव वाढला

श्वानांचा बंदोबस्त करा

बीड : शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे भटके कुत्रे टोळक्याने बसत असल्याने रात्रीच्या वेळेस हे कुत्रे दिसून येत नसल्याने हल्ला चढवत आहेत. यामुळे नागरिक जखमी झाले आहेत. बंदोबस्ताची मागणी आहे.

दलालांचा सुळसुळाट

अंबाजोगाई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, अंबाजोगाई तहसील कार्यालयात मात्र, दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्य माणसाला साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात.

बोंडअळीने कपाशीला पोखरले

बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात अतिवृष्टी आणि अवकाळीच्या तावडीतून बाहेर पडताच या भागात कपाशीला बोंडअळीने पोखरले आहे. एकरी केवळ एक ते दीड क्विंटल उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

वाहतुकीची कोंडी

गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

Web Title: The infestation of mosquitoes increased