विविध शाळांत स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:58+5:302021-08-18T04:39:58+5:30
बीड : नवगण राजुरी येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य केशव भांगे ...

विविध शाळांत स्वातंत्र्यदिन साजरा
बीड : नवगण राजुरी येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य केशव भांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बहिर, मारोतीराव वाघ, उपमुख्याध्यापक एस.एस. शिंदे, उपप्राचार्य एस.वाय. शेख, पर्यवेक्षक आर.आर. शिंदे, बी. एस. भोसले, एस. जी. पिल्ले, एस. एस. पांगारकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन डी. यू. रत्नपारखी यांनी केले. ए.एन. पोकळे यांनी आभार मानले.
केएसपी विद्यालय
बीड : येथील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय (केएसपी) विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अंजली शेळके, हर्षद शेळके, मुख्याध्यापक जगदीश शिंदे आदींची उपस्थिती होती.
यशवंत विद्यालय
बीड : शहरातील यशवंत विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सुदामती वाघ यांनी ध्वजारोहण केले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एम.एस. धुमाळ, ज्येष्ठ शिक्षिका आर. ए. कुलकर्णी, नामदेव वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमास माजी विद्यार्थी नीलेश कागदे व स्नेहल पत्की उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक एम.बी. शेळके यांनी केले.