जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:07+5:302021-03-27T04:35:07+5:30

बीड : व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाबाबत अजूनही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. शुक्रवारी लॉकडाऊनच्या ...

Indefinite closure of traders in the district | जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद कायम

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद कायम

बीड : व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाबाबत अजूनही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी बीड शहरातील मोंढ्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील व्यापार बंद राहिले. जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करत आपली दुकाने बंद ठेवली. लॉकडाऊनचा जाचक आदेश तातडीने रद्द करावा या मागणीवर जिल्ह्यातील व्यापारी संघटना कायम असल्याची माहिती बीड शहर व बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी व बीड शहर व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी दिली आहे.

बीड शहरातील मोंढा भागात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी शिथिल वेळेत व्यापाऱ्यांची दुकाने बंद दिसून आली. लॉकडाऊनच्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या ७ ते ९ या वेळेत व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडता प्रशासनाच्या भूमिकेचा विरोध केला. या बेमुदत बंदला व्यापाऱ्यांतून वाढता पाठिंबा मिळाला असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातही अशीच परिस्थिती कायम होती.

लॉकडाऊनमुळे मागील एक वर्षापासून जिल्ह्यातील व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. अनेक व्यापाऱ्यांचा दुकानाचा किराया आर्थिक अडचणीमुळे देता आलेले नाही. विजेचे बिल दहा महिन्यांपासून थकलेले असताना दुसरीकडे महावितरणकडून व्यापाऱ्यांची वीज तोडली जात आहे. अशा अनेक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर लॉकडाऊन लादले गेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापारी, ग्राहक व सामान्य लोकांचे हीत लक्षात घेऊन लॉकडाऊन मागे घ्यावे अन्यथा व्यापारी महासंघाचा बेमुदत बंद ३० मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचेही सोहनी, पिंगळे यांच्यासह विनोद ललवाणी, मदन अग्रवाल, अनिल गुप्ता, मनमोहन कलंत्री, प्रमोद निनाळ, दीपक कर्नावट, जवाहर कांकरिया, सुरेंद्र रेसादनी, संजय साळुंके, माजलगाव, प्रताप खरात, संजय बरगे, गेवराई, विनायक मुळे, विजय अंडील वडवणी, सुलेख कलंत्री, विठ्ठल मोरे, तेलगाव, माउली फड, रिकबसेठ कांकरिया, नंदसेठ बियाणी, सुमित लाहोटी, परळी, ईश्वर लाेहिया, प्रदीप झरकर, अंबाजोगाई, महादेव सूर्यवंशी, अभिजित, वडगावकर, अशोक जाधव, गजानन गुंडेवार, सचिन डुबे, धारूर, अजित कांकरिया, कलीमभाई, पाटोदा, बबनराव ढाकणे, प्रकाश देसर्डा, शिरूर यांनी कळविले आहे.

दोन तासात २५ टन माल उतरणार का?

लॉकडाऊनच्या आदेशात ठोक किराणा दुकानदारांसाठी सकाळी ७ ते ९ ही वेळ देण्यात आली असली तरी हे वेळ व्यापारी ग्राहकांसाठी सोयीची नाही. मोंढ्यात २५ टन सामानाचा ट्रक उतरविण्यासाठी किमात सहा तासांचा अवधी लागत असून, लॉकडाऊनच्या आदेशातील दोन तास कसे पुरणार? हमालही माल उतरण्यासाठी कमी पडतात. त्याच बरोबर लॉकडाऊनमध्ये दुचाकी, चारचाकी वाहनांना बंदी असेल तर बीडच्या मोंढ्यात दहा किलो मीटर अंतरावरून किरकोळ दुकानदार खरेदीसाठी कसा येऊ शकतो, असा सवाल व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

===Photopath===

260321\26bed_21_26032021_14.jpg

===Caption===

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद  पहिल्या दिवशी यशस्वी झाला.  मोंढा भागातील दुकाने बंद होती. 

Web Title: Indefinite closure of traders in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.