मोबाइलचा वाढता वापर ठरतोय घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:05+5:302021-07-08T04:23:05+5:30
... असे का होते? घराला लॉक लावले की नाही, हे अनेकवेळा तपासणे, वारंवार एकच गोष्ट बोलणे कोणी बोलत असताना ...

मोबाइलचा वाढता वापर ठरतोय घातक
...
असे का होते?
घराला लॉक लावले की नाही, हे अनेकवेळा तपासणे, वारंवार एकच गोष्ट बोलणे
कोणी बोलत असताना अचानकच आपण तो विषय सोडून दुसराच विषय काढून बोलणे
घरातील आपल्यापेक्षा लहान व्यक्ती अथवा पत्नी, मुलांवर अचानक चिडणे
कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित बसून जेवण करणे, वेळोवेळी एकमेकांशी संवाद साधणे
लहान मुले, तरुण मुले-मुलींशी संवाद साधत असताना घरातील सदस्य एकत्र असताना मोबाइल चाळणे टाळावे
ठराविक वेळेसाठी मोबाइल बंद करून अथवा सायलेंट करून शरीरापासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
...
मुलांना, आजोबाला नंबर्स पाठ, कारण...
आजोबा मुलगा घरी वेळेवर येतो की नाही हे विचारण्यासाठी वारंवार फोन करणे, काळजीपोटी दिवसात अनेकवेळा फोनवर विचारणा करतो. त्यातून मुलाचा नंबर पाठ झाला असल्याचे ते सांगतात.
..
बाबा, आई
मोबाइलमध्ये नंबर सेव्ह आहेत. त्यामुळे नंबर कधी पाठ करायचा विचारच केला नाही. परंतु, मुलाकडून नंबर पाठ करून घेतला आहे. कारण तो कुठे विसरला, तर त्याला नंबर सांगता येणे गरजेचे आहे.
....
लहान मुलगा
आई-बाबांचा नंबर पाठ करून घेतला आहे. शाळेत गेल्यावर एखाद्यावेळी ऑटोवाले मामा आले नाहीत तर, त्यामुळे नंबर पाठ असल्यामुळे घरी संपर्क साधून आई, वडिलांना बोलावून घेण्यात आले. त्यामुळे नंबर पाठ असणे गरजेचे आहे.
...
मोबाइलचा अतिवापर घातकच
धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस मोबाइलमध्ये व्यस्त झाला आहे. त्यांचे विश्वच मोबाइल बनत चालले आहे. हे थांबविण्यासाठी ठराविक वेळ मोबाइल वापरावा. दररोज योगा, ध्यान, व्यायाम करावेत. कुटुंबाशी संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच इतर छंद जोपासणे गरजेचे आहे.
- डॉ. सुदाम मोगले. मानसोपचार तज्ज्ञ.