‘आरोग्या’वरील ताण वाढला; आणखी ४०० कर्मचाऱ्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:18+5:302021-04-02T04:35:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आहे ...

‘आरोग्या’वरील ताण वाढला; आणखी ४०० कर्मचाऱ्यांची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. हा ताणी कमी करण्यासाठी आणखी ४०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आरोग्य विभागाला आहे. मनुष्यबळ वाढविल्यास सामान्यांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात रोज ३०० पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच मृत्यूदरही वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला मनुष्यबळ तेवढेच असल्याचे दिसते. जिल्हा रुग्णालयात तर ३०० रुग्णांसाठी केवळ ३ फिजिशियन आणि ७० परिचारीका आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. सहा ते आठ तासांच्या ड्यूटीत त्यांना पाणी पिण्यासही वेळ मिळत नाही. तसेच एखादा रुग्ण अचानक गंभीर झाल्यास अधिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे.
पदभरती सुरुच
वाढती रुग्णसंख्या पाहता अपेक्षेप्रमाणे डॉक्टर, परिचारीका, कक्षसेवकांची भरती केली जात आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, तसेच त्यांना वेळेवर व दर्जेदार उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग कायम प्रयत्नशिल असतो. मनुष्यबळ वाढविण्याबात वरिष्ठ पातळीवरुन निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाबाबत काळजी घ्यावी.
- डॉ.आर.बी.पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
आवश्यक आरोग्य मनुष्यबळ
पदआवश्यक कर्मचारी
फिजिशियन५
वैद्यकीय अधिकारी १५
बीएएमएस १५
बीएचएमएस५
स्टाफ नर्स १००
प्रयोगशाळा तंत्रज्ञ १२०
कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ८०
ऑपरेटर ३०
कक्षसेवक १००