वाढीव दराने खते, बी-बियाणांची विक्री - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST2021-06-09T04:41:34+5:302021-06-09T04:41:34+5:30

परळी : बीड जिल्ह्यातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव दराने होत विक्री होत असल्याच्या तक्रारी ...

Increased rates of sale of fertilizers, seeds - A | वाढीव दराने खते, बी-बियाणांची विक्री - A

वाढीव दराने खते, बी-बियाणांची विक्री - A

परळी : बीड जिल्ह्यातील कृषी दुकानांमधून खते व बी-बियाणे यांची वाढीव दराने होत विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. ही लूट त्वरित थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

सध्या खरीप पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणांची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे शेतकरी पूर्वीपासूनच आर्थिक अडचणीत आहेत. अशातच कृषी दुकाने याची चढ्या भावाने विक्री करून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. शासनाने ठरवलेल्या दराप्रमाणेच शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी मुंडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Increased rates of sale of fertilizers, seeds - A