लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:20 AM2019-04-22T00:20:26+5:302019-04-22T00:22:02+5:30

वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.

Increase the number of tankers as per population growth | लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

लोकसंख्या वाढीनुसार टॅँकरच्या खेपा वाढवा

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : मुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

बीड : वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून मराठवाड्यात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे गावागावात टँकरची संख्या वाढवणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ मधील जनगणना ग्राह्य धरून केला जात आहे. माणसी २० लिटर पाणी पुरवठा होत आहे. मात्र, २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे.
संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या २०११ च्या जनगणनेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. २०११ ते २०१९ या दरम्यान वाढलेली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून माणसी २० लिटर होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. ८ वर्षातील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन टँकरच्या खेपा वाढवणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून कुंडलिका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आण िविभागीय आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Increase the number of tankers as per population growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.