गेवराई परिसरात भुरट्या चोऱ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:46+5:302021-06-27T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : शहरातील भगवाननगर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. यात नागरिकांच्या घरासमोरील ...

गेवराई परिसरात भुरट्या चोऱ्यात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शहरातील भगवाननगर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. यात नागरिकांच्या घरासमोरील पाण्याची मोटार, पाण्याचा ड्रम तसेच दुचाकी मधील पेट्रोल चोरी होत आहे. या भुरट्या चोराचा बंदोबस्त करून या भागात पोलीस पेट्रोलिंग सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी येथील पोलीस ठाण्यात एक निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसापूर्वी सुनील मोटे यांची पाण्याची विद्युत मोटार चोरीस गेली. पंडित यांचा पाण्याचा ड्रम व अनेक दुचाकी गाड्यातील पेट्रोल व घरासमोरील लावलेले लाईटचे बल्ब चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिल्यांदा याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु घटना वाढत चालल्याने येथील नागरिकांनी एकत्र येत पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. निवेदनाद्वारे अभिजीत पंडित, किरण मिसाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, रामेश्वर पवार, जालिंदर फुंदे, संतोष आंधळे यांच्या सह्या आहेत.