रस्त्यांच्या दुरवस्थेने अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:54+5:302021-07-08T04:22:54+5:30
..... प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा वडवणी : शहरातील व्यापारी बाजारपेठ मुख्य समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे ...

रस्त्यांच्या दुरवस्थेने अपघातात वाढ
.....
प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
वडवणी : शहरातील व्यापारी बाजारपेठ मुख्य समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारात प्रसाधनगृहाची कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे ग्राहक, व्यापा-यांची कुचंबणा होत आहे. बाजार तळावरील सार्वजनिक शौचालयांची अनेक दिवसांपासून स्वच्छता केली नसल्याने घाणीने साम्राज्य परसले आहे. तरी शहरात सुलभ शौचालये उभारण्याची मागणी होत आहे.
....
सहा दिवसांत रुग्ण पाॅझिटिव्ह
वडवणी : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. १ ते ६ जुलैपर्यंत १०६० जणांची कोरोना तपासणी झाली. यात ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. तर सहा दिवसांत ३२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. तालुक्यात सध्या ५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वच्या सर्व निगेटिव्ह आढळून आले.
...
स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण
वडवणी : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नगरपंचायतीने कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
....
मोठ्या पावसाचे अपेक्षा
वडवणी : तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. पेरणी झाल्यानंतर कधी रिमझिम पाऊस पडत आहे जोरदार पाऊस पडला नसल्याने खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांपुढे फार मोठे संकट निर्माण होणार आहे. सहा दिवसांत वडवणी महसूल मंडलात फक्त २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कवडगाव मंडळात शून्य मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे.
....