भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST2021-01-03T04:32:52+5:302021-01-03T04:32:52+5:30

चुंबळी फाटा ते सौताडा रस्ता खराब पाटोदा : तालुक्यातील चुंबळी फाटा ते सौताडा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. ...

Increase in accidents due to overloaded vehicles | भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ

चुंबळी फाटा ते सौताडा रस्ता खराब

पाटोदा : तालुक्यातील चुंबळी फाटा ते सौताडा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. बीड-नगर या मार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ राहते; परंतु गेल्या काही दिवसांत चुंबळी फाटा ते सौताडा या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. शिवाय या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

अवैध दारू विक्री

गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

वाहनचालकांकडून नियमांची पायमल्ली

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात वाहन चालकांकडून सातत्याने नियमांची पायमल्ली सुरू आहे. दुचाकी वाहने व ऑटोरिक्षा सर्रास वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र सर्रास पाहायला मिळते. शहरात तर मुख्य रस्त्यावर अनेक ऑटोरिक्षांची बिनधास्तपणे पार्किंग असते. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. अशा स्थितीतही मोकळ्या जागेत पार्किंग न करता सर्रास रस्त्यावर वाहने लावली जातात.

Web Title: Increase in accidents due to overloaded vehicles