गेवराईत आयएमए शाखेचे उद्घाटन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:38+5:302021-03-13T04:58:38+5:30
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व आयएमए प्रार्थनेने झाली. यावेळी डॉ. लोंढे यांनी ...

गेवराईत आयएमए शाखेचे उद्घाटन - A
कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व आयएमए प्रार्थनेने झाली. यावेळी डॉ. लोंढे यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले. संघटन कौशल्य वाढविण्याचे व जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे , सचिव डॉ. शिवाजी काकडे यांनी आयएमएकडून वैद्यकीय व्यावसायिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. गेवराईचे नूतन अध्यक्ष डॉ. जगदीश पोतदार यांनी आयएमएच्या माध्यमातून विविध विषयांवरील सीएमईचे आयोजन करणे विविध शॉर्ट पीजी कोर्सेस चालू करणे, बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांविषयी तसेच कोरोनासारख्या कम्युनिकेबल आजारांविषयी जनजागृती करणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिसंवाद,वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नूतन पदाधिकारी अध्यक्ष डॉ.पोतदार, उपाध्यक्ष डॉ.माने, सचिव डॉ.काकडे व कोषाध्यक्षपदी डॉ.लेंडगुळे आदींचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.
===Photopath===
110321\11bed_3_11032021_14.jpg
===Caption===
गेवराईत आयएमए शाखेचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी संघटनेचे राज्य व जिल्हा तसेच नुतन पदाधिकारी.