वडवणीत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:11 IST2021-09-02T05:11:43+5:302021-09-02T05:11:43+5:30

वडवणी : रोटरी क्लब वडवणीचा पाचवा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी अध्यक्ष प्रा. सतीश भालेराव ...

Inauguration Ceremony of Rotary Club at Wadwani | वडवणीत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

वडवणीत रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा

वडवणी : रोटरी क्लब वडवणीचा पाचवा पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी अध्यक्ष प्रा. सतीश भालेराव व सचिवपदी किशन माने यांनी पदभार स्वीकारला. यावेळी हरीश मोटवानी, दत्ता बारगजे, संतोष माहीते, प्रवीण चोकडा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक संतोष गोडे व आबासाहेब आंधळे होते. नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. सतीश भालेराव व सचिव किशन माने यांना मावळते अध्यक्ष डाॅ. विजय निपटे व सचिव माधव पुरी यांनी कॉलर पिन प्रदान करून पदभार सोपविला. तसेच नवीन चार जणांना पिन प्रदान करून रोटरीचे सदस्यत्व देण्यात आले. हरीश मोटवानी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ॲड. श्रीराम लंगे यांनी केले. माधव पुरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

310821\rameswar lange_img-20210831-wa0014_14.jpg

Web Title: Inauguration Ceremony of Rotary Club at Wadwani