शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

पुरुषोत्तमपुरीत रिक्षाचालकांची रोडवरील मस्ती भाविकांना भोवली;अपघातात २ महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:52 IST

बेशिस्त रिक्षाचालक एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत आहेत

- पुरुषोत्तम करवामाजलगांव:  पुरुषोत्तमपुरीचा रस्ता हा भाविकांसाठी काळ ठरु लागला आहे. चारच दिवसांपूर्वी भाविकांची वाहतूक करणारा अॅटोरिक्षा उलटल्याची घटना ताजी असताना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हूल देण्याच्या प्रयत्नात दोन रिक्षांचा अपघात झाला. यात दोन महिला भाविक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथून बालाजीनगर भागात राहणाऱ्या सुमारे ५० महिला भाविक खाजगी ट्रॅव्हल्सने पुरुषोत्तमपुरीत दर्शनासाठी आल्या होत्या. पुरुषोत्तमपुरी फाटयापासुन ते गावापर्यंतचा सुमारे ३ कि.मी. ऑटोरिक्षांनी जावे लागते. सुरुवातीला ट्रस्टच्यावतीने खाजगी बस लावून गावापर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी असलेल्या तसेच आजुबाजुच्या गावांतील अॅटोरिक्षावाल्यांनी मुजोरी करीत ट्रस्टच्यावतीने सुरु करण्यात आलेली व्यवस्था बंद पाडली. 

रिक्षा चालकांची मनमानीयेथे अॅटो रिक्षा चालकांची मनमानी सुरू आहे. मनमानी भाडे वसूल करुन रत्यावर बेशिस्तपणे रिक्षा चालवली जात असल्आयाने अपघात नित्य झाले. एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात हूल देताना अपघात होत असल्याची माहिती रिक्षातील भाविकांनी दिली. रिक्षा चालकांच्या एकमेकांच्या स्पर्धेचा परिणाम हा भाविकांना भोगावा लागत असून छत्रपती संभाजीनगर येथील पुजा गणेश यशवंते (३०), संगीता गुलाबराव सोनवणे (५५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गावातील उमेश गोळेकर, गोविंद गोळेकर, संदीप शेळके व वसंत लोखंडे या युवकांनी जखमींना उपचारासाठी माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादBeedबीड