शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

जयसिंगरावांची हॅटट्रिक, तर केशरकाकू अन् प्रीतम मुंडेंची हुकली; बीडचे आतापर्यंतचे खासदार...

By सोमनाथ खताळ | Updated: March 19, 2024 17:52 IST

लोकसभा निवडणूक : गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोनवेळा झाले खासदार

बीड : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी खासदार होण्याची हॅटट्रिक केली. तर, केशरकाकू क्षीरसागर यांची हॅटट्रिक १९८९ साली जनता दलचे बबनराव ढाकणे यांच्यामुळे हुकली होती. यासोबतच विद्यमान खा. डॉ. प्रीतम मुंडे या देखील दोन वेळा विजयी झाल्या.  परंतु, चालू निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांच्याच ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांचीही खासदार होण्याची हॅटट्रिक हुकली आहे. गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोन वेळा खासदार झाले आहेत. 

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील समीकरणेही बदलली आहेत. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करुन त्यांच्या ज्येष्ठ भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या खासदारांपैकी केवळ जयसिंगराव गायकवाड हे एकमेव नाव शरद पवार गटाकडून चर्चेत आहे. इतर सर्व नावे ही नवी आहेत. त्यामुळे २०२४ मध्ये बीड जिल्ह्याला नवीन खासदार मिळणार आहे. आता तो कोण असणार ? हे ४ जून २०२४ रोजी मतमोजणीनंतर समजणार आहे.

जे विरोधात लढले, तेच पक्षात आले२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपीनाथराव मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ साली रमेश कोकाटे (आडसकर) यांनीही मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. परंतु, गोपीनाथराव मुंडे यांनी या दोघांचाही पराभव केला. आता हे दोघेही भाजपमध्ये आहेत.

रजनीताईंनी केला काकूंचा पराभवरजनी पाटील यांनी १९९६ साली भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांना भा.रा.काँ.कडून केशरकाकू क्षीरसागर यांनी चांगलीच लढत दिली. परंतु, काकूंचा तेव्हा ताईंनी ५७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर रजनी पाटील यांनी एकदाही लोकसभेची निवडणूक लढवली नाही. रजनी अशोकराव पाटील या सध्या काँग्रेसकडून राज्यसभेच्या सदस्या आहेत.

अशोकराव पाटील यांना एकदाही गुलाल नाहीअशोकराव पाटील हे अनेकदा लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिले. परंतु, अद्यापर्यंत तरी त्यांना एकदाही विजयाचा गुलाल उधळता आला नाही. १९९८ साली २ लाख ९४ हजार मते मिळाली, परंतु अवघ्या सहा हजार मतांनी त्यांना जयसिंगराव गायकवाड यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर १९९९, २०१४ मध्ये देखील त्यांनी निवडणुका लढवल्या.

वर्षनिहाय विजयी उमेदवार / पराभूत उमेदवार२०१९प्रीतम मुंडे - भाजप - ६७८१७५बजरंग सोनवणे - राष्ट्रवादी - ५०९८०७

२०१४ पोटनिवडणूकप्रीतम मुंडे - भाजप - ९२२४१६अशोकराव पाटील - भा.रा.काँ.- २२६०९५

२०१४गोपीनाथराव मुंडे - भाजप - ६३५९९५सुरेश धस - राष्ट्रवादी - ४९९५४१

२००९गोपीनाथराव मुंडे - भाजप - ५५३९९४रमेश आडसकर - राष्ट्रवादी - ४१३०४२

२००४जयसिंगराव गायकवाड - नॅ. काँ. पा. - ४२५०५१प्रकाश सोळंके - भाजप - ३७७६३९

१९९९जयसिंगराव गायकवाड - भाजप - ३३२९४६राधाकृष्ण पाटील - रा.काँ.पा. - २८१७५६

१९९८जयसिंगराव गायकवाड - भाजप - ३००३०७अशोकराव पाटील - भाराकाँ - २९४२०४

१९९६रजनी पाटील- भाजप - २७९९९५केशरकाकू क्षीरसागर - भाराकाँ - २२२५३५

१९९१केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - २६००३५प्रा. सदाशिव मुंडे - भाजप - १७२४०९

१९८९बबनराव ढाकणे - जनता दल - २२९४९६केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस इ - २२७५११

१९८४केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय- २२१४२१श्रीधर गीते - अपक्ष - १११०५९

१९८०केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - २०३८७०रघुनाथ मुंडे - काँग्रेस यू - १३६३३७

१९७७गंगाधर बुरांडे - माकप - १९७४९७लक्ष्मण देशमुख - काँग्रेस - १४५६००

१९७१पंडित सयाजीराव त्रिंबकराव - भाराकाँ - १८७१३२गंगाधर बुरांडे - सीपीएम - २३५५१

१९६७क्रांतिसिंह नाना पाटील - सीपीआय - १२५२१६एन. के. मंधाणे - भाज संघ - २५०३३

१९६२द्वारकादास मंत्री - भाराप - ९५७००बाबर अहेमद हुसेन अत्तार - सीपी आय - ७५१७१

१९५७रखमाजी धोंडिबा - भाराप - ६६०१३काशीनाथ तात्याबा - सीपीआय - ५८०९०

१९५२रामचंद्र परांजपे - पीडीएफ - ६७७५२श्रीधर वामन नाईक - भाराकाँ- ५८५०१

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस