शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

योजना राबवून देखील शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन सपशेल अपयशी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:47 AM

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या परिस्थितीमुळे २०१८ या वर्षात जवळपास १८७, तर २०१२ पासून ७ वर्षांच्या कालावधीत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. या परिस्थितीमुळे २०१८ या वर्षात जवळपास १८७, तर २०१२ पासून ७ वर्षांच्या कालावधीत जवळपास १२०० शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली.शेतक-यांनी आत्महत्या करु नयेत यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्याचा दावा केला जातो. परंतु योजनांची योग्यरित्या अंमलबाजवणी होत नसल्यामुळे शेतक-यांना लाभ मिळत नाही. जेवढा निसर्ग या आत्महत्येला कारणीभूत आहेत तेवढेच शासन देखील अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात एक वर्षाआड दुष्काळाची दाहकता सहन करावी लागते त्यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडलेले असते यातच कर्जबाजारीपणा व नापिकी ही पाचवीला पुजलेली असल्यामुळेच की काय, आत्महत्या केलेल्या बहुतांश शेतक-यांजवळ नापिकी व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहोत या आशयाची चिट्ठी सापडते. त्यामुळे शासकीय योजना नेमक्या कुठे वापरल्या जातात व कोणाचं भलं करतात, असा प्रश्न शेतक-यांमधून विचारला जाऊ लागला आहे.वैरण विकासशेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. जनावारांच्या चा-यासाठी कडबाकुट्टी व चारा कात्रण करण्यासाठी यंत्राची मागणी ४९ शेतकरी कुटुंबाने केली होती मात्र, त्यापैकी फक्त २१ जणांना या योजनेचा लाभ देण्यात आल आहे.कौशल्य विकास अंतर्गत १४४ जणांनी केली रोजगाराची मागणीआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १४४ सदस्यांनी रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी फक्त १२ जणांना लाभ देण्यात आला आहे. १३२ जण लाभापासून वंचित आहेत.आरोग्यविषयक उपचारया कुटुंबातील १९१ जणांनी आरोग्यविषयक उपचाराची मागणी उभारी अंतर्गत केली होती. मात्र, त्यापैकी १२६ जणांना विविध आजारांवर उपचार करुन लाभ देण्यात आला आहे. ६५ जण या योजनेपासून वंचित आहेत.कर्ज देण्यास टाळाटाळआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३१९ जणांनी शेतीपूरक व्यवसाय व पीककर्जासाठी बँकेकडे मागणी केली होती. परंतु या योजनेंतर्गत ३४ जणांना लाभ देण्यात आला आहे, तर २८५ कुटुंबियांना मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात आली.शेतीमध्ये वीजजोडणीशेतामधील पिकांना पाणी देण्यासाठी शेतात वीज जोडणी करुन देण्यात यावी, अशी मागणी ३३० शेतकरी कुटुंबियांनी केली होती. त्यापैकी १९० जणांना लाभ देण्यात आला आहे. २१० जण अद्यापही या योजनेपासून वंचित आहेत.घरी वीजेची जोेडणीराहत्या घरी वीज जोडून देण्याची मागणी ३७४ शेतकरी कुटुंबियांनी केली होती. त्यापैकी २८४ जणांना वीजजोडणीचा लाभ मिळाला आहे. ९० जण अद्यापही वंचित आहेत.२३० कुटुंबियांना मिळाली नाही विहीरआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी योजनेंतर्गत शेतात विहीर देण्यात येते. यामध्ये ५८६ शेतकºयांनी विहिरीची मागणी केली होती. पैकी ३५६ जणांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २३० कुटुंबीय विहीर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.शेततळेमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ७० जणांनी शेततळ्याची मागणी केली होती. त्यापैकी फक्त १७ जणांना शेततळ्याचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे ५३ कुटुंबीय अद्यापही शेततळ्यापासून वंचित आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षेचा दिला लाभअन्नसुरक्षा योजनेंतर्गत ७८८ शेतकरी कुटुंबियांनी मागणी केली होती. या योजनेचा पूर्णपणे लाभ देण्यात आला आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजनामहात्मा फुले योजनेंतर्गत ५५ शेतकरी कुटुंबाना मागणी केली होती. त्यापैकी ५३ कुटुंबियांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.शुभमंगल सामूहिक विवाहयोजनेत उदासीनताआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांतील तरुण-तरुणींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत १०५ जणांनी मागणी केली होती. त्यापैकी फक्त १३ जणांनाच याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सामूहिक विवाह योजनेत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.हॉस्टेल सुविधेसाठीविद्यार्थ्यांच्या फेºयाआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील विद्यार्थी शिक्षणासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये आहेत. त्यांना हॉस्टेल सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना ‘उभारी’मध्ये समाविष्ट आहे. या योजनेंतर्गत २३३ जणांनी हॉस्टेल सुविधेची मागणी केली होती. त्यापैकी ३८ जणांना लाभ देण्यात आला आहे. अद्यापही १९५ विद्यार्थी हॉस्टेल सुविधेपासून वंचित आहेत.२३५ कुटुंबीय उघड्यावर५६५ शेतकरी कुटुंबियांनी शौचालयाची मागणी केली होती. त्यापैकी ३३० जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २३५ कुटुंबीय अद्यापही उघड्यावरच शौचास जातात.घरकूल योजनेचा लाभ नाही८६३ शेतकरी कुटुंबियांनी पक्की घरे बांधण्यासाठी घरकूल योजनेची मागणी केली होती. त्यापैकी २२८ जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही ६३५ कुटुंबीय पक्क्या घराविनाच असल्याचे दिसून येते.जनधन बँक खातेविविध आर्थिक व्यवहाराकरिता जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी ३३५ जणांनी मागणी केली होती. त्यापैकी ३१८ जणांना याचा लाभ देण्यात आला आहे.कुटुंब अर्थसहाय्य योजना८० शेतकरी कुटुंबियांनी या योजनेंतर्गत मागणी केली होती. त्यापैकी ५४ जणांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे २६ जण कुटुंब अर्थसहाय्य योजनेपासून वंचित आहेत.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वेतनया योजनेंतर्गत ५४४ जणांनी मागणी केली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह वेतन दिले जाते. यामध्ये उभारी अंतर्गत ५१७ जणांना याचा लाभ देण्यात आला आहे. २७ जण अद्यापही योजनेपासून वंचित आहेत.सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता टंचाई उपायोजनबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना उभारी देण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याGovernmentसरकार