माजलगावात आज टेंबे गणपतीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:37 IST2021-09-21T04:37:53+5:302021-09-21T04:37:53+5:30

लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथील ब्रम्हवृदांनी गणपती उत्सव सुरू केला होता. निजाम राजवटीत या गणपतीला रजाकारांनी मिरवणूक अडवून ...

Immersion of Tembe Ganpati in Majalgaon today | माजलगावात आज टेंबे गणपतीचे विसर्जन

माजलगावात आज टेंबे गणपतीचे विसर्जन

लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन येथील ब्रम्हवृदांनी गणपती उत्सव सुरू केला होता. निजाम राजवटीत या गणपतीला रजाकारांनी मिरवणूक अडवून परवानगी नाकारली म्हणून गणपती जागीच ठेवून हैदराबाद येथे जाऊन परवानगी आणण्यात आली. त्यानंतर भाद्रपद एकादशी दिवशी स्थापना करण्यात आली. हाच दिवस कायम राहिला. आजतागायत हीच परंपरा कायम आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून शुक्रवारी मिरवणूक न काढता टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली. कोरोनाचे तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने भाविकांनी मास्क लावून शिस्तीत दर्शन घेतले. यावर्षी अडीच फूट उंचीची चिखल मातीची मूर्ती बनवण्यात आली आहे. त्याचबरोबर नुकतेच देहावसान झालेले चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या समाधी व महादेव पिंडीचा देखावा करण्यात आला तो लक्ष वेधून घेणारा ठरला. स्थापनेपासून दररोजची आरती फेसबुक लाईव्ह ठेवण्यात आली होती. चार दिवसानंतर प्रतिपदा तिथीनुसार मंगळवारी सायंकाळी अत्यंत साधेपणाने टेंबे गणपतीचे परंपरा पाळून विसर्जन होणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी सांगितले.

Web Title: Immersion of Tembe Ganpati in Majalgaon today