‘आयएमए’चा पदग्रहण सोहळा; पांगरीकर, शिंदेंकडे पदभार सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:57+5:302021-01-04T04:27:57+5:30

बीड : इंडियन मेडिकल असोसिएशन, बीडचा पदग्रहण साेहळा शनिवारी थाटात पार पडला. बीडचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, उपाध्यक्ष डॉ. ...

IMA's inauguration ceremony; Pangarikar, Shinde handed over the charge | ‘आयएमए’चा पदग्रहण सोहळा; पांगरीकर, शिंदेंकडे पदभार सुपुर्द

‘आयएमए’चा पदग्रहण सोहळा; पांगरीकर, शिंदेंकडे पदभार सुपुर्द

बीड : इंडियन मेडिकल असोसिएशन, बीडचा पदग्रहण साेहळा शनिवारी थाटात पार पडला. बीडचे अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेत धडाधडीने काम करण्याचा निश्चय केला.

बीड शहरातील आयएमएच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्य शाखेतर्फे बीड शाखेला ‘बेस्ट ब्रांच अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. पांगरीकर यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. उपस्थितांचे आभार डॉ. शशिकांत दहीफळकर यांनी मानले.

अशी आहे नवी कार्यकारिणी

अध्यक्ष - डॉ. अनुराग पांगरीकर, उपाध्यक्ष - डॉ. प्रमोद शिंदे, सचिव - डॉ. सुधीर हिरवे, सहसचिव - डॉ. राहुल जाजू, कोषाध्यक्ष - डॉ. शशिकांत दहीफळकर, सहकोषाध्यक्ष - डॉ. सुनील नाईकवाडे, महिला प्रतिनिधी - डॉ. संजीवनी कोटेचा. यावेळी वुमेन्स डॉक्टर विंगचेही पदग्रहण करण्यात आले. ॲडव्हायझर- डॉ. विनिता ढाकणे, चेअरपर्सन -डॉ. संजीवनी कोटेचा, को-चेअरपर्सन - डॉ. शुभदा पांगरीकर व कन्व्हेनर - डॉ. किरण हिरवे यांनी पदभार घेतला.

अनिल बारकुल ‘बेस्ट प्रेसिडेंट’

आपत्ती, अडचणींच्या काळात संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रम घेऊन संघटनेची मान उंचावली. याबद्दल आयएमएचा ‘बेस्ट प्रेसिडेंट’चा पुरस्कार तत्कालीन अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल यांना प्रदान करण्यात आला. डॉ. लोंढे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

Web Title: IMA's inauguration ceremony; Pangarikar, Shinde handed over the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.