शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मी वादळ-वाऱ्यांला घाबरणारी नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:53 IST

परळी : धो, धो कोसळणारा पाऊस, कडाडणाºया विजा आणि सुसाट वारा अशा निसर्गाच्या रूद्रावतारातही परळी विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार ...

ठळक मुद्देमुसळधार पावसात पंकजा मुंडे यांनी साधला मतदारांशी संवाद

परळी : धो, धो कोसळणारा पाऊस, कडाडणाºया विजा आणि सुसाट वारा अशा निसर्गाच्या रूद्रावतारातही परळी विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी गुरुवारी अंबाजोगाई तालुक्यातील मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी रस्त्यावर थांबून अबालवृद्ध, महिला, पुरूषांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.ताई, तुमच्यामुळे मतदारसंघाला चांगले दिवस आले आहेत. आम्ही सुद्धा तुमच्यावर मतांचा पाऊस पाडणार असा शब्द मतदारांनी दिला. यावेळी पंकजा मुंडे यांनी छत्री बाजूला सारून अशा वादळ वा-याला घाबरणारी नाही. माझ्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे रक्त आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीन. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर आणि माझ्यावर या भागाने नेहमी प्रेम केले आहे. पुढील काळात विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आशीर्वादाचे त्यांनी आवाहन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, राजाभाऊ औताडे, शामराव आपेट, गणेश कराड, महादेव फड व सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते.रोजगार देणारे उद्योग प्रकल्प आणायचे आहेतपरळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव, भारज आणि लिंबगावात पंकजा मुंडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी तुमच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी विशेष योजना आणून काम करायचे आहे. कधी नव्हे एवढा विकास मी मंत्री झाल्यापासून केला आहे. गावोगावी, गल्लोगल्ली चांगले रस्ते झाले आहेत.विकासात दळणवळणाला महत्त्व असते, त्यासाठी आपल्या भागातील सर्वच रस्ते चांगले केले आहेत. आगामी काळात युवकांच्या हाताला काम देणारे उद्योग या भागात आणायचे असून शेत मालावर प्रक्रि या करणारे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा