शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अंबाजोगाईत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी वाटली खिरापत; ११ हेक्टर जमिनीवर केला बेकायदेशीर फेरफार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:36 IST

बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले.

ठळक मुद्देया प्रकारामुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नंबर ५९२ मधील ११ हेक्टर २२ आर शेतजमीन शासकीय मालकीची असताना तलाठी व मंडळअधिकारी यांनी संगनमत करून बेकायदेशीरपणे फेरफार करून  दुसऱ्याच्या नावे केली. या प्रकारामुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर कारभारामुळे तलाठी व मंडळाधिकारी दीड महिन्यापूर्वी निलंबित झाले. त्यांच्या कालावधीतील बेकायदा कृत्य आता बाहेर येऊ लागले आहेत.  

अंबाजोगाई शहरातील सर्व्हे नंबर ५९२ हा भाग शासकीय अध्यापक महाविद्यालय, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, शासकीय प्रेक्षागृह इमारत, शासकीय निवासस्थान इमारत, सुरक्षा रक्षक कर्मचारी वसाहत, हे एकूण क्षेत्र १३ हेक्टर ४२ आर इतके आहे. हे क्षेत्र निजामकाळापासून अभिलेखात ‘फौज निगराणी तामिरात’ या नोंदीखाली म्हणजेच ही जमीन लष्कराच्या ताब्यातील आहे. ही जागा सैन्य दलाने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी व शासनाच्या मदतीने मोजून घेतली होती. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व जमीन लष्कराकडे असल्याची नोंद आहे. असे असतानाही अंबाजोगाई येथील तत्कालिन तलाठी व मंडळाधिकारी  यांनी संगनमत करून यातील ११ हेक्टर २२ आर (२८ एकर) शेतजमीन २९४९७ इतर फेरफार दि. २८ एप्रिल २०२० रोजीचे दुरूस्ती फेरफार पत्राचा आधार घेत सदरील जमीन अमित अशोक मुथा, उगमा कस्तूरचंद मुथा, कमल जवाहरलाल संचेती, कांचनबाई प्रदीप बोथरा, ज्योत्स्ना  अशोक मुथा, ज्योती अरूण मुगदिया, प्रकाश   सुरजमल मुथा, प्रमोद कस्तूरचंद मुथा, प्रेमचंद कस्तूरचंद मुथा, ललित सुगनचंद मुथा, विजय सुगनचंद मुथा, विनोद कस्तूरचंद मुथा, शोभा महावीर सुखानी, सुमित अशोक मुथा, संतोष सुरजमल मुथा, दीपक सुगनचंद मुथा यांच्या नावे हे सर्व क्षेत्र करण्यात आले.

या प्रकाराची माहिती उपअधीक्षक भूमि अभिलेख, अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाने सदरील शेतजमीन ही  ‘फौज निगरानी तामिरात’ लष्काराच्या मालकीची असतांना या जमिनीची नोंद व्यक्तिंच्या नावावर खाजगी स्वरूपात कशी काय झाली? याची पडताळणी  झाली व या संबंधीचा अहवाल महसूल विभागाला दिला. उपअधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिलेल्या अहवालात ११ हेक्टर २२ आर क्षेत्राची झालेली नोंद बेकायदेशीरपणे प्रमाणित केलेली आहे. जिल्हाधिकारी बीड व लष्कर विभाग यांची परवानगी नसतांना झालेला फेरफार शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून तसेच शासनाचा नजराना बुडवून तयार करण्यात आलेला आहे. जागेची नोंद घेतांना आंध्र  प्रदेश सर्कल सिव्हील कोर्ट  कंपाऊंडचे डिफेन्स इस्टेट आॅफिसर  यांची परवानगी अथवा संमत्ती न घेता सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीर फेरफार नोंद क्रमांक २९४९७ अन्वये संतोष मुथा, इतर नावे यांची महसूली दफ्तरी आहेत. जमीन शासकीय असल्याने व्यवहार बेकायदेशीर असल्याचे पत्र भूमिअभिलेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. तहसीलदारांकडून मागविला अहवालया प्रकरणाचा अहवाल तहसीलदारांकडून मागविला आहे. सर्व्हे नंबर ५९२ मधील ११ हेक्टर २२ आर हे क्षेत्र बेकायदेशीररीत्या सातबाराला लावण्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अहवाल आपण तहसीलदार यांच्याकडून मागविला आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. सदरील जमीन शासनाच्या मालकीची आहे. जिल्हाधिकारी अथवा आंध्र प्रदेशातील लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीशिवाय फेरफार करता येत नाही, असे उपजिल्हाधिकारी  शोभा जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

दीड महिन्यापूर्वी तलाठी व मंडळाधिकारी झाले होते निलंबितशासकीय जमिनीची नियमबाह्य विल्हेवाट लावणे, क्षेत्राच्या नोंदी बदलणे, सातबारावरील नोंदी बदलणे, फेरफारबाबतच्या तक्रारी आणि अधिकार क्षेत्राबाहेरची कामे करणे अशा अनेक बेकायदेशीर कृत्याचा ठपका ठेवत, अंबाजोगाईचे मंडळाधिकारी व तलाठी यांना दीड महिन्यापूर्वी सेवेतून निलंबित  करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. त्यांच्या कार्यकाळातील निघालेले हे प्रकरण आहे. अजूनही अशी अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाई