वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:16+5:302021-01-08T05:47:16+5:30
रस्त्याची दुरवस्था बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ...

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
रस्त्याची दुरवस्था
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील रस्ता पूर्ण खराब झाला असून, रस्त्यावर गटारीचे पाणी वाहत आहे.
घाणीचे साम्राज्य वाढले
माजलगाव : शहरातील प्रमुख मार्गावरच न.प.च्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य साचले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शहरात स्वच्छता अभियान राबवून त्यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. यातच या रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
विजेचा लपंंडाव
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.