अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:35+5:302021-01-08T05:48:35+5:30
विजेच्या तारांचा धोका पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात वीज पुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. तसेच त्या जीर्णही झाल्या ...

अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष
विजेच्या तारांचा धोका
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात वीज पुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळल्या आहेत. तसेच त्या जीर्णही झाल्या आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या तारांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण असून, दुरुस्तीची मागणी आहे.
स्वच्छता मोहीम राबवा
बीड : शहरातील सहयोगनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. परिसरातील रहिवासी आणि व्यापारी येथे कचरा आणून टाकत असल्याने मोठी दुर्गंधी सुटत आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देत मोहीम राबवत परिसरातील कचरा उचलून न्यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
खड्डे बुजवावेत
चौसाळा : तालुक्यातील चौसाळा गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मणक्याचे आजार जडत आहेत. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्ती खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.
पांदण रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेताना देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पंचायत समितीने यामध्ये लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.