कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:31 IST2021-08-01T04:31:05+5:302021-08-01T04:31:05+5:30

विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षक कवाडांचा अभाव ...

Ignore the use of paper glass | कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष

कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष

विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत

पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षक कवाडांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्यूज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे.

पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास

बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना-जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

वाढीव वीजबिलांचा ग्राहकांना झटका

अंबाजोगाई : लॉकडाऊन काळात विद्युत देयके मिळाली नाहीत. दोन महिन्यांपासून येणारे विजेचे बिल भरमसाठ येत असल्याने ग्राहकांचे टेन्शन वाढले असून, आर्थिक बजेटही कोलमडले आहे. त्यातच घरगुतीसह व्यावसायिक विद्युत बिलांचे आकडे फुगले आहेत. याचा मोठा झटका विद्युत ग्राहकांना बसला आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीचे अधिकारीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकंदरीत आलेल्या वीज देयकाने बिल भरायचे की कुटुंबाचा गाढा ओढायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खाद्यतेलात दरवाढ; नागरिक त्रस्त

अंबाजोगाई : शेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफल आदी खाद्यतेलाच्या दरात या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ११० रुपये प्रतिकिलो मिळणारे तेल आता १४५ ते १५० रुपये झाले आहे. याशिवाय गॅसचे दरही भडकले आहेत. पेट्रोलचे दरही वाढले आहेत. एकूणच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागले असून, दाद मागावी तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुलांची काळजी घेण्याचे आवाहन

अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी लहान मुलांची पालकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे, तसेच लहान मुलांना घराबाहेर पडण्यासाठी खबरदारी बाळगावी. असे आवाहन श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल मस्के यांनी केले आहे.

Web Title: Ignore the use of paper glass