शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 20:24 IST

'आरोपीला वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.'

केज(बीड)- मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्याचा गुन्हा गुन्हेगारांनी संघटित होऊन केलेला गुन्हा असल्यामुळे शासनाने या प्रकारणातील सर्व आरोपींना मकोका लावलेला आहे. सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू असतानाही जर एखादाही आरोपी सुटतो आहे, याची चाहूल लागताच देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार, असा इशारा धनंजय देशमुख यांनी पोलीस, तपास यंत्रणा व प्रशासनाला दिला आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अतिशय क्रूरपने संघटित होऊन गुन्हेगारांनी हा गुन्हा केलेला आहे. या प्रकारणाचे सर्व पुरावे पोलीस आणि तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. असे असताना याप्रकारणी कोणीही दगा फटका करू नये, ही आपली प्रामाणिक इच्छा आहे. आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीने आमच्या मनात कसलीही चलबिचल  झालेली नाही. परंतु या प्रकारणात एखादा आरोपीला वाचविण्यासाठी कोणीही दगाफटका करू नये, ही आपली इच्छा असून सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, ही आमची प्रामाणिक मागणी असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

तर देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार.?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे असतानाही तो तब्बल दोन वर्षे पोलिसांच्या नाकावर टीच्चून केजमध्ये उघडपणे फिरत होता. त्याला पोलिसांनी वेळीच आवर घातला असता, तर ही घटना घडलीच नसती. त्याला अभय देणारे कोण आहेत, हे तपास यंत्रनेला माहित आहे. असे असतानाही  सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा कोणताही  आरोपी सुटणार याची चाहूल लागताच देशमुख कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलणार असल्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारीSuresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडे