कृषी केंद्रांत खरेदीसाठी वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:44+5:302021-07-02T04:23:44+5:30

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी ...

Hustle for shopping in agricultural centers | कृषी केंद्रांत खरेदीसाठी वर्दळ

कृषी केंद्रांत खरेदीसाठी वर्दळ

शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी व्यस्त आहे. बी-बियाणे, खते आणून ठेवले आहे. असे असले, तरी काही भागात मात्र पाऊस कमी आहे. तेथील शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

बैलापेक्षा शेतात ट्रॅक्टरच जास्त

शिरूर कासार : तालुक्यात सध्या शेतीकामाची लगीनघाई सुरू आहे. पाळी, मोघडा, रेघा आणि लावणी पेरणी ही कामे सुरू आहेत. मात्र, सध्या शेतात बैलजोड्यांपेक्षा ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने, शेतशिवारात ट्रॅक्टरची संख्या वाढल्याचे दिसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरने मशागत महागाची झाली असली, तरी काम लवकर उरकण्यासाठी बैलांपेक्षा ट्रॅक्टरलाच शेतकरी पसंती देत आहेत.

ग्रामपंचायतींकडून मार्गदर्शन

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा? काय काळजी घ्यायची? कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठ्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Web Title: Hustle for shopping in agricultural centers