शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

माहेरातून पैसे न आणल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 3:08 PM

सणावाराला माहेरी आल्यावर छळाबाबत समीना वडिलांना सांगत. परंतु वडील तिची समजूत घालून नांदावयास पाठवत.

ठळक मुद्देकौटुंबिक व लग्नातील मानपानाच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

बीड : पत्नीला जिवे ठार मारल्याप्रकरणी पतीला आजन्म कारावास व २५ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच. एस. महाजन यांनी १५ डिसेंबर रोजी सुनावली. 

गेवराई तालुक्यातील दादेवाडी, खळेगाव येथील शेख रशीद शेख अब्दुल यांची मुलगी समीना हिचे २०१० मध्ये   गुळज येथील अस्लम याकुब शेख याच्याशी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन वर्ष सासरच्या लोकांनी समीना हिला व्यवस्थित नांदविले. नंतर कौटुंबिक व लग्नातील मानपानाच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. सणावाराला माहेरी आल्यावर छळाबाबत समीना वडिलांना सांगत. परंतु वडील तिची समजूत घालून नांदावयास पाठवत.  समीनाने त्रास सहन करून संसार केला. त्या दरम्यान दिला चार अपत्येही झाली. परंतु सासरचे लोक माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लक्ष रुपये घेऊन यावे, अशी  मागणी करीत समीना हिचा छळ करून तिला मारहाण करत.

१७ ऑक्टोबर २०१७ रोजी समीनाचे दुखत असून ती बोलत नाही, हे समजल्यानंतर वडील शेख रशीद शेख अब्दुल हे गुळज येथे गेले असता समीना मृतावस्थेत आढळून आली. तिचा गळा काळा निळा होऊन सुजलेला दिसून येत होता. तसेच हनुवटीला मारलेले वळखण दिसून येत होते. या प्रकरणी शेख रशीद शेख अब्दुल यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात  अस्लम याकुब शेख, सलाम याकुब शेख, आसीफ याकुब शेख, याकुब बनेमिया शेख, कलीमुन्नीसा ऊर्फ कलीमा याकुब शेख यांच्याविरूध्द खून, विवाहितेचा छळ व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला. तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन. एम. शेख यांच्याकडे वर्ग करण्यात आला. दोषारोप पत्र न्यायालयास सादर करण्यात आले. 

अन्य आरोपींची निर्दोष मुक्तताप्रकरणाची सुनावणी  प्रमुख जिल्हा व सत्र न्या. एच. एस. महाजन यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने मयत समीनाचा पती अस्लम याकुब शेख यास कलम ३०२ भादंवि अंतर्गत दोषी धरून आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली तर इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले. प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहायक सरकारी वकील बी. एस. राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सहायक फौजदार सी. एस. इंगळे यांनी पाहिले.

टॅग्स :jailतुरुंगBeedबीडMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप