शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आणखी किती बळी जाणार ? नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अथवा गोळ्या घाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 2:35 PM

अमरावती, औरंगाबाद विशेष पथके आणि बीड जिल्ह्यातील वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात 

ठळक मुद्दे ७ पिंजरे, ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे, १२५ कर्मचारी बिबट्याला पकडण्य्साठी तैनात बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न 

आष्टी : पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवर नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला असून आष्टी तालुक्यात बिबट्याची दहशत मागील चार दिवसांपासून चांगलीच वाढली आहे. दि.२४ रोजी सुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला पुन्हा शुक्रवारी दि.२७ या बिबट्याने तालुक्यातील किन्ही गावातील एका ९ वर्षीय मुलाची शिकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. आ.सुरेश धस यांनी सुद्धा नागरिकांना धीर दिला. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी बबन गुंजाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात गुंजाळ यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या सर्व प्रकाराने दहशतीत असलेल्या नागरिकांनी आणखी किती बळी जाणार ? असा संतप्त सवाल करून नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अथवा गोळ्या घाला अशी मागणी केली आहे. 

तालुक्यात मागिल काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दि.२४ रोजी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या नागनाथ गर्जे या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शुक्रवारी दि.२७ दुपारी स्वराज सुनील भापकर हा मुलगा आपल्या काका कृष्णा हिंगे यांच्यासोबत शेतात गेला होता.यावेळी हिंगे हे तुरीला पाणी देण्यासाठी मोटर सुरु करण्यास गेले.त्यावेळी स्वराज हा त्यांच्यासोबत गेला. मात्र तिथे अगोदरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्वराजवर झडप मारली.यावेळी त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला स्वराजला शेतातून फरफटत घेऊन जात असताना कृष्णा हिंगे यांनी ग्रामस्थांना फोन करून घटनेची माहिती देत शेतात मदतीला येण्याचे आवाहन केले.यावेळी ग्रामस्थ शेतात जमल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली.दरम्यान शेतापासून काही अंतरावर स्वराजचा मृतदेह आढळून आला या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १२५ कर्मचारी,अमरावती व औरंगाबादचे विशेष पथके, बीड जिल्ह्यातील वनविगातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. परिसरात ७ पिंजरे लावण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली.

राज्यातील सर्वोत्तम पथक तैनात पथके किन्ही आणि सुरडी परिसरात पथके सक्रिय आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी अमरावतीचे विशेष पथक राज्यातील सर्वात उत्कृष्ट पथक असून या पथकाने आतापर्यंत अनेक हिंस्त्र प्राण्यांना पकडले आहे. नागरिकांनी वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे - शाम सिरसाठ ( वनपरिक्षेत्र अधिकारी आष्टी ) 

नागरिकांनी सावधानता बाळगावी नागरिकांनी घराच्या बाहेर जाताना गळ्यात मफलर किंवा जाड टॉवेल चादर असं काहीतरी गुंडाळा सोबत दांडा किंवा काठी काहीतरी हातात असू द्या,  त्याचबरोबर एकापेक्षा जास्त लोकांनी मिळून जायचं आहे. जाताना आपल्या सोबत मोबाईल असेल तर मोठ्या आवाजात स्पीकर ऑन करून गाणे किंवा काहीतरी संगीत लावा. जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही  तोपर्यंत नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. - सलीम चाऊस, पोलिस निरीक्षक आष्टी 

आ.सुरेश धस घटनास्थळी ठाण मांडून आ. सुरेश धस यांनी  औरंगाबाद व अमरावती येथुन आलेल्या १२५ जवानांच्या विषेश प्रशिक्षित पथकासह घटनास्थळाची पाहणी केली व गावकऱ्यांना धीर दिला आहे. गावकऱ्यांना धीर देत आ. धस घटनास्थळी शुक्रवारी पूर्ण दिवस ठाण मांडून होते.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्याBeedबीड