गृहिणी खूश, व्यापारी नाराज, बेरोजगार, शेतकऱ्यांना अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:15+5:302021-02-05T08:22:15+5:30

-स्नेहल संतोष पांडे, गृहिणी, माजलगाव या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र व्यापाऱ्यांचा या अर्थसंकल्पात काहीच फायदा ...

Housewives happy, traders unhappy, unemployed, farmers expect | गृहिणी खूश, व्यापारी नाराज, बेरोजगार, शेतकऱ्यांना अपेक्षा

गृहिणी खूश, व्यापारी नाराज, बेरोजगार, शेतकऱ्यांना अपेक्षा

-स्नेहल संतोष पांडे, गृहिणी, माजलगाव

या अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांना या सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र व्यापाऱ्यांचा या अर्थसंकल्पात काहीच फायदा झाला नाही.

--धनराज बंब, किराणा होलसेल व्यापारी, माजलगाव

या बजेटमधून आम्हाला भरपूर अपेक्षा होत्या, परंतु काही फायदा होईल असे वाटत नाही.

--आनंद मोगरेकर, खासगी नोकरदार, माजलगाव

शेतकऱ्यांना या बजेटमधून मोठा फायदा होईल असे वाटत आहे. यातून आम्हाला शेतीमालाला चांगला भाव मिळेल ही अपेक्षा आहे. - दत्ता काळे, शेतकरी, माजलगाव

शासनाने या अर्थसंकल्पात आम्हाला करसवलत दिली. यामुळे आता व्यापारात पुन्हा ज्येष्ठ नागरिक येऊ शकतात.

---- ओमप्रकाश मालपाणी, ज्येष्ठ नागरिक, माजलगाव

या बजेटमध्ये सरकारने आयात शुल्क साडेबारावरून साडेसात टक्यांवर आणल्याने दागिन्यांचे भाव कमी होतील, त्यामुळे ग्राहकी वाढेल. -रामराजे रांजवन , सराफा व्यापारी, माजलगाव

केंद्र सरकारच्या बजेटमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचा मानस असल्याने बेरोजगारा युवकांना नोकऱ्या मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

----डिगंबर सपकाळ, युवक, माजलगाव

सरकार बजेट जाहीर करत असते, पण या बजेटबाबत आम्हाला काही घेणे देणे नसून शासनाने केवळ आमच्या मुला बाळांना रोजगार उपलब्ध करून द्यावा -शेख जिलानी, ॲटोरिक्षाचालक, माजलगाव

आम्हाला बजेटच काही माहिती नाही, पण सरकारने आमच्या भाजीपाल्याला भाव वाढवून देण्यासाठी कायदा करावा

----भगवान रासवे, भाजीपालाविक्रेता, माजलगाव

Web Title: Housewives happy, traders unhappy, unemployed, farmers expect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.