५६६ पैकी फक्त १२ लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:12+5:302021-01-10T04:26:12+5:30
माजलगाव : माजलगाव नगर परिषदेने घरकुल योजनेचा गाजावाजा करून ५६६ लाभार्थ्यांची नावे घोषित केली. त्यापैकी फक्त ...

५६६ पैकी फक्त १२ लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता
माजलगाव : माजलगाव नगर परिषदेने घरकुल योजनेचा गाजावाजा करून ५६६ लाभार्थ्यांची नावे घोषित केली. त्यापैकी फक्त १२ लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर घरकुलाचा हप्ता जमा केला आहे. मात्र, इतर ५५४ लाभार्थ्यांचा हप्ता जमा का झाला नाही असा प्रश्न उपस्थित करीत उर्वरित मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाची रक्कम जमा करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. माजलगांव नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात चाव्या असूनसुद्धा घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याची स्थिती आहे. घराचे बांधकाम चालू करा, निम्मे काम झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल, असे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले. नगर परिषदेवर विश्वास ठेवून काही लाभार्थ्यांनी स्वतःचे सोने तोडून, तर काहींनी व्याजाने, उसनवारी करून घर बांधकाम सुरू केले. मात्र, आतापर्यंत फक्त १२ लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. उर्वरित ५५४ लाभार्थी नगर परिषदेत चकरा मारून बेजार झाले आहेत. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांनी यात लक्ष घालून घरकुलाच्या लाभार्थ्यांना तत्काळ रकमेचे वाटप करावे, नसता आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे.