हॉटेल, हातगाडे, फळ व्यावसायिकांची अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे फिरवली पाठ; प्रशासनाकडून एकही कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:17+5:302021-03-24T04:31:17+5:30

माजलगाव तालुक्यात मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जास्त संपर्कात असणाऱ्या व्यापारी, ...

Hotels, handcarts, fruit traders turn their backs on antigen tests; No action from the administration | हॉटेल, हातगाडे, फळ व्यावसायिकांची अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे फिरवली पाठ; प्रशासनाकडून एकही कारवाई नाही

हॉटेल, हातगाडे, फळ व्यावसायिकांची अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे फिरवली पाठ; प्रशासनाकडून एकही कारवाई नाही

माजलगाव तालुक्यात मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जास्त संपर्कात असणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना अ‍ॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक केले होते. सुरुवातीस व्यापाऱ्यांनी या टेस्टकडे पाठ फिरविली होती, परंतु, प्रशासनाने अ‍ॅन्टीजेन टेस्ट करा, अन्यथा दुकाने उघडू देणार नाही, अशी सक्त ताकीद दिली. त्यावर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या; परंतु, यात हातगाडे, फळ व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिकांनी सपशेल या अ‍ॅन्टीजेन टेस्टकडे पाठ फिरवली आहे. हे व्यावसायिक ही मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या संपर्कात येतात, कारण याचे व्यवसाय हे मुख्य रस्त्यावरच आहेत. ही बाब स्थानिक प्रशासनाने कामाचा लोड नको, म्हणत दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. परंतु, आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर यास प्रशासनास या चुकीची किंमत मोजावी लागेल.

न.प.चे पथक नावालाच

प्रशासनाने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अँन्टीजन टेस्ट अनिवार्य केली होती. मोठ्या व्यावसायिकांनी अँन्टीजन टेस्ट करून घेतल्या परंतु शहरातील छोट्या हाॅटेल, फळविक्रेते, गाडेवाल्यांनी अद्याप कोरोना टेस्टच केल्या नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

कोणी टेस्ट केली की नाही हे पाहण्यासाठी नगरपालिकेने आठ दिवसांपूर्वी ३-४ वेगवेगळी पथकांची नेमणूक केली. मात्र, शहरातील २५ ते ३० टक्के व्यापाऱ्यांनी अँन्टीजन टेस्ट केलेल्या नसताना या पथकाकडून आठ दिवसांत एकही कारवाई करण्यात आली नसल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Hotels, handcarts, fruit traders turn their backs on antigen tests; No action from the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.