हॉटेल फोडणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:25 IST2020-12-27T04:25:08+5:302020-12-27T04:25:08+5:30
बीड : माजलगाव येथील आंबेडकर चौकातील एका हॉटेलच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम व मोबाईल ...

हॉटेल फोडणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
बीड : माजलगाव येथील आंबेडकर चौकातील एका हॉटेलच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम व मोबाईल चोरल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
माजलगाव शहरातील आंबेडकर चौकात ईश्वरलाला भगवानजी भट यांचे हॉटेल आहे. २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या हॉटेलच्या स्लायडिंगची खिडकी तोडून चोरट्याने आत प्रवेश केला होता. दरम्यान, याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी शिंदेवाडी ता. माजलगाव येथील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन माबोईल व रोख रक्कम २८ हजार ४०० रुपये असा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी त्याला माजलगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रकरणाचा तपास पोउपनि थोटे करीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.