शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार; शिरूर कासार येथे ५२ वसतिगृहात आहेत २२१५ विद्यार्थी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:17 IST

शिरुर कासार तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते.

बीड : शिरुर कासार तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराचा परिणाम पाल्यांच्या शिक्षणावर होऊ नये म्हणून  शिक्षण विभागाकडून हंगामाआधीच सर्वेक्षण करुन मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्थलांतर रोखलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय म्हणून त्यांना वसतिगृहात प्रवेश देऊन शिक्षणातील अडथळा दूर करण्यात आला आहे. 

तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते.  दुपारी शाळेतच पोषण आहार दिला जातो. तालुक्यातून मोठ्या संख्येवर ऊसतोड मजूर स्थलांतरीत होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला फटका बसू नये तसेच शिक्षणाच्या प्रवाहापासून ते वंचित राहू नये म्हणून सर्वशिक्षा विभागाकडून  महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येतो. परंतु शाळेच्या वसतिगृहाबाबत देखील भ्रष्टाचाराची कीड दिसून आल्याने यात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रीक पद्धती, आॅनलाईन उपस्थिती आणि त्याचा वरिष्ठांना नित्य अहवाल देणे यामुळे हा आकडा वाढवता येणे शक्य नसल्याने वसतिगृहाच्या व लाभार्थ्यांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे.

पारदर्शक कारभार मागील वर्षी वसतिगृहाचा आकडा ६९ होता तो ५२ झाला असल्याने पारदर्शक पद्धतीला काही अंशी यश आले म्हणावे लागेल. वेळोवेळी वसतिगृहांना भेटी देऊन त्यांना दिल्या जाणार्‍या भोजन व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जेथे गरज आहे तेथे आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गटशिक्षण अधिकारी जमीर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाBeedबीड