वर्दळीच्या रस्त्यावर आडवीतिडवी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:31+5:302021-04-02T04:35:31+5:30
गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच ...

वर्दळीच्या रस्त्यावर आडवीतिडवी वाहने
गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक नगर रोडवर अनेक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच मंगल कार्यालये आहेत. येथे असलेल्या गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे नसून सूचना फलक लावलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
भुरट्या चोरांचा वावर वाढला
बीड : गाडीतील पेट्रोल, बॅटरी, पाण्याची मोटार, पाइप, वायर अशा कंपाऊंडमधील वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील हद्दवाढ भाग, तसेच रहिवासी भागातील घरांच्या कंपाऊंडमधील साहित्य चोरीला जात आहे.
स्थानकासमोरील ‘नो पार्किंग’चा बोजबारा
धारूर : धारूर बसस्थानकासमोर ‘नो पार्किंग’चा बोजबारा उडाला आहे. सर्रास या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने लावलेली असतात. रहदारीला अडथळा होतो व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. तत्काळ ‘नो पार्किंग’ची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सर्रास चोऱ्या होत आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.