आशा, गटप्रवर्तकांची अंबाजोगाईत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:24+5:302021-06-23T04:22:24+5:30
या वेळी अंबाजोगाई परिसरातील शेकडो महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...

आशा, गटप्रवर्तकांची अंबाजोगाईत निदर्शने
या वेळी अंबाजोगाई परिसरातील शेकडो महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. तहसीलदारांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कॉ. अजय बुरांडे, प्रा. प्रशांत मस्के, कॉ. देविदास जाधव, अशोक शेरकर, तालुका अध्यक्ष सविता होके, निर्मला भागवत, आशा जाईर, तसेच आशा गटप्रर्वतक कीर्ती कुंठे, स्नेहा मोरे, स्वाती गंडले, अनुराधा चव्हाण, निता वीर, वनमाला बनाले, सविता मगर, अश्विनी पांचाळ, अनिता इंगळे, अनंता कुठेवार, जयश्री साळवे, स्वाती गडदे व अन्य आशा उपस्थित होत्या.
आशा व गटप्रवर्तकांच्या या आहेत मागण्या
महाराष्ट्र सरकारने आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, तसेच ही मागणी मान्य होईपर्यंत आशा स्वयंसेविकांना १८००० रुपये व गटप्रवर्तकांना २२००० रुपये प्रतिमहा वेतन देण्यात यावे.
सर्व नगरपालिकांतील आशा स्वयंसेविकांना, तसेच ग्रामीण विभागातील आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना प्रतिदिन ३०० रुपये व केंद्रसरकारचे १००० रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात यावा. १७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात केलेली वाढ विनाविलंब व पूर्ण द्यावी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा मोबदला आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पूर्णतः द्यावा. कोरोना बाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरसह बेड राखीव ठेवावेत व त्यांना विनामूल्य उपचार देण्यात यावा. कोरोना संबधित काम केल्यामुळे मृत्यू झाल्यास वारसांना ५० लाख रुपयांचे विमाकवच देण्याच्या राज्य शासनाच्या आदेशात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात यावा.
===Photopath===
220621\avinash mudegaonkar_img-20210622-wa0080_14.jpg